आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Royal Airforce Bomb Squadran's First Director Nicky Thomas

स्त्रीशक्ती: लेकीच्या हवाई दल प्रवेशाने पालकांची उडाली होती झोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
*निकी थॉमस : फायटर पायलट
*वय : ३६ वर्षे
*कुटुंब : जॅकलिन (आई) आणि पीटर(वडील), दोघे निवृत्त अभियंते आहेत. एक बहीण जेनी.
*शिक्षण: अॅरॉनॉटीकल इंजीनिअरिंग

चर्चेत : रॉयल एअरफोर्स बॉम्ब स्क्वाड्रनच्या नुकत्याच पहिल्या महिला कमांडर झाल्या.

निकी थॉमस ८८ कोटी रुपये किमतीच्या टॉर्नेडो विमानाच्या स्क्वाड्रन कमांडर झाल्या आहेत. २५० प्रशिक्षित वैमानिकांच्या त्या टीम लीडर आहेत. त्या ज्या विमानांचे उड्डाण करतात त्यावर दर तासाला ३२ लाख रुपये खर्च होतो. आपल्या स्क्वाड्रनला घेऊन त्या उन्हाळ्यात इराकमध्ये ऑपरेशन शेडरला जाणार आहेत. तालिबानवर बॉम्बवर्षाव करणा-या निकी यांनी अफगाणिस्तानमध्ये ३५ युद्धमोहिमा पूर्ण केल्या आहेत. त्यांनी सद्दाम हुसेनच्या राजवाड्यावरही बॉम्ब टाकले आहेत.

२००० मध्ये अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर नेव्हिगेटर रॉयल एअरफोर्समध्ये रुजू झाल्या. २००९ मध्ये रॉयल एअरफोर्सच्या टॉर्नेडो लढाऊ विमानाचे उड्डाण करणा-या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांचा सक्सेस फ्लाइंग रेट १०० टक्के आहे, म्हणजे मोहिमेवर निघाल्यानंतर ती पूर्ण केल्याशिवाय थांबल्या नाहीत. त्यांच्यातील या धाडसीपणामुळे बहीण जेनी थॉमस त्यांना वॉर लेडी संबोधते. एका ब्रिटिश दैनिकामध्ये त्यांनी आपल्या लढाऊ वैमानिक बहिणीची यशोगाथा लिहिली आहे. २००९ मध्ये निकी यांनी रोमांचित अनुभव सांगितला. त्या दिवशी काही जण कंदहार एअरबेसजवळ बोगदा खोदत होते. तालिबानींचे हे कृत्य त्यांच्या लक्षात आले. निकी यांनी त्या ठिकाणावरून १०० फूट उंच ५०० मीटर प्रतितास वेगाने विमान उडवले. तालिबानी घाबरून बाहेर निघाले. दुसरीकडे एके दिवशी निकीची एक सहकारी कपडे धूत असताना तालिबानींनी रॉकेट डागले. या हल्ल्यातून वाचल्यानंतर त्या म्हणाल्या, बरे झाले प्राण वाचले; अन्यथा लोक म्हणाले असते, कपडे धुताना मारली गेली. निकी जेनीला ई-मेलवर अत्यंत भीतिदायक घटनांची माहिती देत नाहीत. आपली मुलगी युद्धग्रस्त भागात कशी लढते याचे आईला वाईट वाटले असते यासाठी त्या माहिती देत नव्हत्या. घरातील एकही सदस्य लष्करात नाही. त्यामुळे हवाई दलात प्रवेश केल्यानंतर अनेक दिवस आई-वडिलांना झोप लागत नव्हती.