आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sadashiv Amrapurkar By Umesh Ghevrikar

तात्यांचं मातीशी असलेलं नातं...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदाशिव अमरापूरकर सर्वसामान्य गरीब, दलित, अशिक्षित, मुस्लिम, अंधश्रद्धेत पिचलेले शोषित व राज्यकर्ते आणि निसर्गाकडून नाडला गेलेला शेतकरी यांच्याविषयी सतत कणव बाळगून असत. फक्त ‘बोलण्याचं’ काम न करता त्यांच्या परिस्थितीत बदल व्हावा म्हणून जिथे-जिथे काही परिवर्तनवादी काम चालू असेल त्या ठिकाणी तन-मन-धनाने मदत करत हे ऐकून धक्का बसेल.
निळू फुले, डॉ. लागू यांच्यासोबत सामाजिक कृतज्ञता निधी उभारणी या कामासोबतच खेड्यापाड्यातील सर्वसामान्य शेतकरी मित्रांच्या शेतीविषयक समस्यांवरील उपाययोजना, विशेषत: अहमदनगर जिल्ह्यातील अमरापूर, शेवगाव, ढोरजळगाव, आव्हाणे या दुष्काळी गावांतील कार्यकर्ते मित्रांसाठी ग्रामसुधारणा, शिक्षण, आरोग्य याविषयी प्रशिक्षणासाठी स्वखर्चाने ते कार्यकर्ते पाठवत.
इतकेच नव्हे, तर या कार्यकर्त्याने आपल्या गावात ते काम सुरू केले का? ते सुरळीत सुरू आहे का? याचा पाठपुरावाही करत, प्रसंगी ‘कामचुकारांचे’ कानही धरत. जिल्ह्याच्या अडलेल्या विकासावर प्रस्थापित नेत्यांना जाहीर कार्यक्रमात खडे बोल सुनावतानाच माध्यमातील चर्चेतूनही भ्रष्ट व निगरगट्ट राजकीय नेत्यांना झोडपण्याचा ‘बाणा’ त्यांनी जपला, कारण त्यांनी कधीही कुणाकडे स्वत:साठी काही मागितले नाही. उलट कोट्यवधी रुपये किमतीचा मुंबईतला कलावंत कोट्यातून मिळालेला ‘फ्लॅट’ स्वत:चे घर मुंबईत विकत घेतल्यावर परत करण्याचा (इंडस्ट्रीत दुर्मिळ असलेला) प्रामाणिकपणा दाखवला!

प्रतिभासंपन्नतेला असलेली माणुसकीची जोड त्यांना खरा मोठेपणा देऊन गेली. त्यांच्या संपूर्ण प्रवासात धर्मपत्नी सुनंदाताईंचाच त्यांना खरा आधार होता. (सामाजिक बांधिलकीसह) थेट तेंडुलकर- कुसुमाग्रजांकडून त्यांना प्राप्त झाला होता. तो त्यांनी निष्ठेने जपलाही! अलीकडेच ‘हेच तर वय असते’ हे नवं नाटक त्यांनी लिहून घेतलं होतं. त्याचे प्रयोगही त्यांना करायचे होते; पण... तात्या... हे जाण्याचं वय नसतं हो...!