आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांसोबत पावसातही खंबीरपणे उभा राहणारा उद्योगपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : मुंबईत राहणारे जिंदल माजी खासदार नवीन जिंदल यांचे मोठे भाऊ आहेत.
*सज्जन जिंदल : जिंदल स्टीलचे प्रमुख
*जन्म : ५ डिसेंबर १९५९
*शिक्षण : बंगळुरू विद्यापीठातून तंत्रज्ञानात पदवी
*कुटुंब : पत्नी: संगीता जिंदल, दोन मुली- तारिनी, तन्वी आणि मुलगा पार्थ
चर्चेत का ? : त्यांनी पश्चिम बंगालमधील शेतक-यांची २९४ एकर जमीन मोफत परत करण्याची नुकतीच घोषणा केली आहे.

मुंबईत राहणारे जिंदल माजी खासदार नवीन जिंदल यांचे मोठे भाऊ आहेत. स्वच्छ भारत अभियानात ते पत्नी संगीता आणि आपल्या स्टाफच्या ५० लोकांसोबत मुंबईत एका एनजीओसोबत स्वच्छता करताना दिसून आले. सुरुवातीपासून आक्रमकपणे कामकाज करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.
ऑक्टोबर १९९९ मध्ये सज्जन ३८ वर्षांचे होते तेव्हा कर्नाटकच्या विजयनगरमध्ये स्टील प्लँट सुरू करण्याच्या तयारीत होते. कोळशापासून पोलाद वितळवण्याच्या तंत्रज्ञानावर ते विचार करत होते. सहका-यांवर त्याचा विश्वास नव्हता. काम सुरू होणार होते तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसात कोळसा भट्टीत टाकावा लागला. तेव्हा पोलाद वितळण्यास सुरुवात झाली. साधारण २०० लोकांसोबत ते पावसात खंबीरपणे उभे राहिले होते. शेवटी प्लँट बंद करावा लागला. सहा महिन्यांनंतर तो पुन्हा सुरू झाला आणि नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी तो चालवून दाखवला. याची माहिती पोलाद उद्योगात पसरली की जिंदल कामगारांसोबत उभे राहिले. त्या वेळी टाटा स्टीलचे एमडी विजयनगरमध्ये एका दौ-यावर गेले तेव्हा त्यांनी सज्जन यांची काम करण्याची पद्धत पाहिली. तेथे आल्यानंतर आपल्या कामगारांना म्हणाले, ‘या व्यक्तीकडे(सज्जन) पाहा, आपण जसे काम करतो अगदी तसेच ते काम करत आहेत.’ त्यांचे म्हणणे खरे झाले. पोलाद उद्योगात जिंदल यांचा व्यवसाय हजारो कोटी होता. टाटा स्टील त्यांनी यात मागे टाकले होते.
दोन्ही मुलींच्या विवाहातून मुक्त झालेले जिंदल यांनी आपल्या मुलास पार्थला गेल्या वर्षीपासून जेएसडब्ल्यूच्या मुख्यालयात आणण्यास सुरुवात केली. हरियाणा व दिल्लीऐवजी त्यांनी मुंबईत काम करण्यास पसंती दिली. सरकार भलेही मध्यान्ह भोजन योजना सुरू चालवत आहे, मात्र जिंदल यांच्या बेल्लारी आणि ठाणे जिल्ह्यात दररोज जवळपास २ लाख मुलांना त्यांच्याकडून भोजन दिले जाते.