आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी: लंडनमध्ये डिझायनिंगचे शिक्षण, आता अनाथ मुलांचे आयुष्य सावरण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेरणादायी| सना शकूर, फॅशन अॅसेसरी डिझायनर

शिक्षण: लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून रिटेल मॅनेजमेंट
कुटुंब: अशनफ शकूर (मेट्रो ऑप्टिशियन-वडील, मुंबईतील प्रसिद्ध चष्मेवाला परिवार),
रजिया-आई, जुबेर (४२ वर्षांचा भाऊ), मुबाशराह (४३ वर्षांची बहीण).
चर्चेत : मुंबईत आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन गरजू मुलींसाठी निधी संकलन
केले.

स्टाइलमध्ये राहावयास व सृजनशील काम करण्यास आवडत होते, त्यामुळे डिझायनिंगचे क्षेत्र निवडल्याचे सना शकूरने दिव्य मराठीला सांगितले. दुबईत मी नुकताच स्वत:चा नोमादा ब्रँड लाँच केला आहे. आई ३० वर्षांपासून समाजसेवेशी जोडली आहे. तिच्या माध्यमातूनच समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. मुस्लिम असल्यामुळे आपल्या लोकांसाठी काही करावे, असे नेहमी वाटत होते. त्या नुकत्याच हज समितीच्या सदस्य झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया चॅप्टरच्या युवा शाखेशी जोडल्यानंतर ती आता प्रमुख आहे. अडीच वर्षांपूर्वी मुलावर दीड लाखाचा उपचार करू न शकणारी महिला भेटली. घरी आल्यानंतर
आईशी बोलले. लोहारामध्ये एक महिला अनाथ मुली आणि निराधार महिलांसाठी काम
करत असल्याचे सांगितले. ती एक केंद्र सुरू करत असल्याने मदत करायला हवी. यानंतर मी तिथे जाऊन शिकवू लागले. त्यांचे जीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्या अडचणी कळल्या.

येथील ३२० महिला असून त्यांना भोजन, शिक्षण आणि कपडे ठेवण्यासाठी जागा दिली जाते. केंद्रासाठी पैशाची आवश्यकता होती. नऊ महिन्यांपूर्वी मुंबई मॅरेथॉनबाबत ऐकले होते. त्यात सहभाग घेऊन निधी उभारण्याची कल्पना सुचली. आठ वर्षांपासून योग करत असल्यामुळे तंदुरुस्त होते. त्यामुळे धावण्यात अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले.