आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्या नाडेला यांच्या जीवनाशी संबंधित रंजक माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्या नाडेला/जन्म: 1967, हैदराबाद
सत्या नाडेला यांना मायक्रोसॉफ्टचे सीईओपद मिळताच ते जगातील सर्वात शक्तिशाली इंडियन टेक एक्झिक्युटिव्ह बनले आहेत. त्यांच्या जीवनाशी संबंधित तसेच त्यांनी ज्या चार इंडियन कॉर्पोरेट लीडर्सना पछाडत यश मिळवले त्यांच्याबाबत काही माहिती येथे देत आहोत.
क्रिकेट, संगीत आणि कवितांची विशेष आवड
० त्यांना संगीताची आवड आहे. विशेषत: रॉक म्युझिकवर त्यांचे विशेष प्रेम आहे. शाळेत असताना ‘बिटल्स’ हा त्यांचा आवडता बँड होता. सत्या यांना गाणी गाण्यापेक्षा वाद्ये वाजवण्याची जास्त आवड होती, असे हैदराबाद पब्लिक स्कूलच्या संगीत शिक्षिका डेनिस पॉवेल यांनी सांगितले.
०कविता वाचून त्यांचा तणाव दूर होतो. ऑस्कर वाइल्ड हा त्यांचा आवडता कवी. ‘वुई नीड टू बिलिव्ह द इम्पॉसिबल अँड रिमूव्ह द इम्प्रोबेबल’ हे त्यांचे आवडते वाक्य आहे.
० क्रिकेट आपले पॅशन असल्याचे ते सांगतात. शाळेच्या संघात त्यांचा समावेशही होता. क्रिकेटमुळेच संघभावना आणि नेतृत्व गुणाची शिकवण मिळाली.
० वेळ घालवण्यासाठी त्यांना सर्वाधिक आवडणारी बाब म्हणजे कसोटी पाहणे. हा एखादी रशियन कादंबरी वाचल्यासारखा अनुभव असतो. कारण त्यात अनेक चढ-उतार असतात, असे ते सांगतात.
अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास
० लहानपणापासूनच त्यांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. ते जेवढी पुस्तके वाचतात, त्याहून अधिक खरेदी करतात. त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवे शिकायची किंवा वाचायची इच्छा असते. जेव्हा तुम्ही शिकणे बंद करता, तेव्हा तुम्ही महान आणि कामाच्या गोष्टी करणे बंद करता, असे त्यांचे मत आहे. जी. व्ही. देसाई यांचे ‘ऑल अबाऊट अ हॅट्टर’ हे त्यांचे आवडते पुस्तक. रिकाम्या वेळेत ते ऑनलाइन कोर्स करतात. रोज सकाळी 15 मिनिटे तरी काही नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. न्यूरो सायन्सवर ते ऑनलाइन लेक्चरही ऐकतात.
०नेहमी प्रगती करायची अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी विविध कामांमध्ये रस घेतला. त्यांनी 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये प्रवेश केला. प्रत्येक शुक्रवारी ते रेडमंडहून शिकागोला मॅनेजमेंट क्लाससाठी जायचे. अडीच वर्षांत त्यांनी एमबीए पूर्ण केले.
०नवीन गोष्टी शिकण्यात प्रचंड रस असल्याने क्लासमध्ये ‘हाऊ’ आणि ‘व्हाय’वर त्यांचा जोर असायचा. पहिली पायरी पूर्ण समजल्यानंतरच ते पुढे जायचे.
एका वेळी एकच काम...
० कामात व्यग्र असल्याच्या कारणाने ते जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग साइटपासूनही दूर राहिले. 2009 मध्ये दर महिन्याला एक पोस्ट करायचे; पण 11 जुलै 2010 नंतर त्यांनी एकही पोस्ट केली नाही. चार वर्षांनंतर ट्विट करून त्यांनी नियमित अपडेट राहणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रेमाची कथा व मुलांना गोष्टी
०1992 मध्ये अनुपमा यांच्याशी विवाह केला. ते त्यांना शाळेपासून ओळखायचे. अनुपमा यांनीही मणिपालमधून इंजिनिअरिंग केले आहे.
०वडिलांची जबाबदारीही चोखपणे पूर्ण करतात. रोज रात्री मुलांना गोष्टी सांगून झोपवतात.
०महाविद्यालयीन मित्रांच्या संपर्कातही आहेत. वर्षातून एकदा कुटुंबीयांसह हैदराबादला येतात.