Home »Divya Marathi Special» Article On Saving For Child Education

मुलांच्या शिक्षणासाठी अशी करा बचत

उमा शशिकांत | Jan 06, 2013, 02:34 AM IST

  • मुलांच्या शिक्षणासाठी अशी करा बचत

अपर्णाला मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. इतर पालकांप्रमाणे तिला तिच्या मुलाला चांगले शिक्षण द्यायचे आहे. मुलाचा सांभाळ ती एकटीच करते. चार सदस्यांच्या तिच्या कुटुंबात ती एकटीच कमावते. बँकेत नोकरी असल्यामुळे पगार चांगला मिळतो. संसारासाठी पैसा उभा करू शकते. अपर्णाला स्वत:साठी चांगले टॅक्स सेव्हिंग प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे.


चांगला परतावा आणि दीर्घ काळ फायदा मिळवण्यासाठी पीपीएफ खरेदी करायचे आहेत. पाच वर्षांपूर्वी तिने पहिल्या मुलाच्या नावावर सेव्हिंग अकाउंट उघडले होते. या वर्षी तिला इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) घ्यायची आहे. इक्विटीमध्ये पैसा लावण्यात जास्त जोखीम आहे. यातून मुलाच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा मिळेलच असे नाही.
तिला तीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहिली- शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यामुळे तिने महागाईपेक्षा जास्त वेगाने परतावे मिळतील, अशा प्रकारचे प्रॉडक्ट खरेदी करायला पाहिजे. इक्विटीमध्ये ते शक्य आहे. दुसरी- अपर्णाला योग्य स्टॉक खरेदी करण्यात आणि ते योग्य वेळी खरेदी-विक्री करण्यात अडचण येत आहे. ज्या प्रॉडक्टमध्ये हे सर्व आधीच केलेले असेल असे प्रॉडक्ट तिच्यासाठी उपयोगी आहे. तिसरी- अपर्णाने छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून जास्त पैसे कमवायला पाहिजेत. त्यामुळे तिच्यासाठी इक्विटी-म्युच्युअल फंड योग्य प्रॉडक्ट ठरेल.


शेअर बाजार वर-खाली होताना गुंतवणूक केली तरच इक्विटीत पैसा गुंतवणे फायद्याचे ठरते. शेअर बाजार खाली आल्यास परतावे कमी मिळतील; पण बाजार वधारल्यास चांगले परतावे मिळतील.


तिला स्वत:ला स्टॉकची माहिती असेल तर तिने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. यात फंड मॅनेजर स्टॉक खरेदी-विक्री करतील. तिला फक्त पोर्टफोलिओ तयार करून पैसा गुंतवायचा आहे. तिला फंड्सची निवड खबरदारीने करावी लागेल, जेणेकरून मार्केट इंडेक्समधून उत्तम परिणाम मिळतील. अपर्णाने निर्णय घेतला की, ती बचतीमधील अर्धा भाग पीपीएफ आणि उर्वरित रक्कम ईएलएसएसमध्ये लावेल. त्यामुळे तिला दोन्हीचे फायदे मिळतील. पीपीएफमुळे इक्विटीचे नुकसान भरून निघेल आणि पीपीएफच्याच फिक्स्ड रिटर्नमधून इक्विटीत गुंतवणूक करून जास्त पैसे कमावता येतील. जसे की, फ्रुट सॅलड किंवा आइस्क्रीम वेगवेगळे खाण्यापेक्षा दोन्हीच्या मिश्रणातून एक वेगळा पदार्थ तयार करता येऊ शकतो. त्यापासून तयार झालेले नवे डेझर्ट रसनेला अधिक तृप्त करते.

Next Article

Recommended