आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी ठेवो ना ठेवो, तुमचा स्वत:वर विश्वास आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही काहीच करू शकत नाहीत, असे म्हणण्याची संधी कुणालाही देऊ नका. कारण स्वत: काही करत नसलेले लोकच तुम्हाला तुम्ही निष्क्रिय असल्याचे टोमणे वारंवार मारत असतात.

एक मुंगी एका माणसाला सांगते की , ‘माणसे माझा रस्ता अडवतात. तेव्हा मी दुसरा रस्ता शोधते आणि पुढे चालत राहते. ते मला भिंतीवरून पाडतात तेव्हा मी पुन्हा भिंतीवर चढू लागते. कोणताही अडथळा असो किंवा कितीही कठीण अडथळे असो, स्वत:वर विश्वास ठेवत मला पुढे जावे लागते. मी करू शकते. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी संघर्ष करत राहीन. मी लढत राहीन आणि मी करू शकते, या विश्वासावर मी कायम राहते.’

इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात अथवा नाही, या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. मी करू शकतो, यावर स्वत:चा विश्वास असायला हवा. या पद्धतीने तुम्ही वागलात तर आयुष्यात हवे ते मिळवू शकाल. इतर व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास ठेवला किंवा नाही याचा तुमच्या कामावर काहीही परिणाम होत नाही. तुमचा स्वत:वर विश्वास असणे खूप आवश्यक आहे.

एका माणसाचे हृदय एकदा त्याला म्हणाले की, ‘तू तुझ्या आईच्या गर्भात होता तेव्हापासून आतापर्यंत मी कार्यरत आहे. अशाच प्रकारे हातानेही त्याच्या कर्तव्याबाबत सांगितले. पायांनीही स्वत:चे काम पटवून दिले.’ हे सर्वजण माणसाला म्हणाले, ‘आम्ही आमची कर्तव्ये पार पाडतो, त्याचप्रमाणे तूसुद्धा तुझी कर्तव्ये पार पाडत सातत्य राखून स्वप्न पूर्ण करू शकतो. या पद्धतीने आयुष्य जगणे खूप सोपे होईल. ’