आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sharad Pawar Politics By Arun Ramthirthkar

मौसी, बसंती भी तय्यार, मध्यावधी रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोले चित्रपटातील वीरू ऊर्फ धर्मेंद्र याचा पाण्याच्या टाकीवरील संवाद सर्वांना आठवत असेल बसंतीशी लग्न होत नाही म्हणून वीरु आत्महत्येसाठी टाकीवर चढतो याला घाबरुन मोसी मै तय्यार हू म्हणते बसंतीही हो म्हणते. त्यावर वीरु कमालीचा खुश होऊन आत्महत्या रद्द करतो. अल्पमतातील सरकार चालवणा-या देवेंद्र यांची अवस्था धर्मेंद्रसारखी झाली होती. शिवसेना रुसली होती. देवेंद्र सरकार घटनाबाह्य असल्याचेही जाहीर केले होते. त्यातच शरद पवार यांनी पक्षाच्या अलिबाग चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांना मध्यावधीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेचा नकार राष्ट्रवादीने अंगठा दाखवणे काँग्रेस तर वैरी, अशा परिस्थितीत १९ नोव्हेंबरला देवेंद्र सरकारची सुसाईड नक्की झाली होती, पण शिवसेनेने पवारांच्या धमकीचा फुगा फोडला. ज्यांच्यामुळे सरड्याने झाडावर आत्महत्या केली त्या शरद पवारांनीही २४ तासांत रंग बदलला. सरकार चालवण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही या भूमिकेचे रुपांतर सरकार पाडण्यात रस नाही. असे १८० कोनात बदलले. देवेंद्राचे पाठबळ १२३ वरुन सव्वा दोनशेवर गेले. मध्यावधी टळली. १८ नोव्हेंबरपूर्वी काही झाले नाही. २० नोव्हेंबरनंतर काही झाले नाही. शरद पवारांनी प्रसिद्धीचा लांब गेलेला झोत आपल्या अंगावर पाडून घेतला एवढेच.
काहीच झाले नाही म्हणताना दोन गोष्टींची नोंद घ्यावीच लागेल. पहिली म्हणजे गोची करण्याचा पलटवार शिवसेनेने राष्ट्रवादींवर केला. मंत्रिपदासाठी शिवसेना धुसफूस करत असताना राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेची गोची केली होती. शिवसेनेला नाइलाजाने विरोधी बाकावर बसावे लागले होते. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजप सरकार निवांत झाले होते. जरा विचार करा. मीच मुख्यमंत्री होणार असे म्हणणा-या उध्दव ठाकरेंनी हे दिवस कसे कंठले असतील देवाच्या काठीला आवाज नसतो. काही कारण नसताना शरद पवारांना चिंतन शिबिरात मध्यावधीचा इशारा देण्याची दुर्बुद्धी झाली. दुर्बुध्दीच म्हणायची दुसरे काय देवेंद्र सरकार महिन्याचे होतेय. मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशन व्हायचे आहे. सरकारने काही निर्णय घेतले पण वादग्रस्त म्हणावा असा एकही निर्णय झालेला नाही. एक तर मागितला नसताना पाठिंबा दिला तोही बिनशर्त आता आम्हीच मक्ता घेतलाय का असा प्रश्न पवारच विचारतात. मध्यावधीची भाषा करतात कसले ताळतंत्रच नाही. सरड्याने उगीच आत्महत्या केली नाही.
पवारांची भाषणबाजी जेवढी अनपेक्षित तेवढीच त्यावरील शिवसेनेची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. अगदी अक्कलकोट स्वामींचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे उद्गार आठवले. अगोदर वाटले आता शिवसेना भाजप सरकारला सळो की पळो करुन सोडणार. पण झाले भलतेच पवारांचा इशारा कचरापेटीत टाकत, मुख्य विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेनेच अभयदान दिले. शिवसेनेचे हे अभयदान म्हणजे पवारांनी केलेल्या गोचीची परतफेड होती. पवारांचे बोलणे गांभीर्याने घेऊ नका सरकार पडणार नाही तशी वेळ आम्ही येऊ देणार नाही. अशी शिवसेनेची नि:संदिग्ध भूमिका होती. पवारांना वाटले की शिवसेना-भाजप आधीच पेटलेले आहेत. आपण त्यात काडी टाकावी. पण झाले भलतेच बेभरवशाचा गडी ही पवारांची प्रतिमा गडद झाली. दुसरे प्रसिध्दी माध्यमांना दोष देत पवारांनी सरकार पाडण्यात रस नाही, अशी शेपूट घातली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे पवारांना तसे करावे लागले. निदान आता तरी भाजपने नैसर्गिक मित्र असलेल्या सेनेला जवळ करावे. चारच जागांचा प्रश्न आहे. ताटात काय वाटीत काय. देऊन टाका नंतर ४ वर्षे ११ महिने सुखनैव राज्य कारा. काँग्रेसमुक्त भारत या मोदींच्या घोषणेला महाराष्ट्रातून विधायक प्रतिसाद द्या.
या दोन दिवसातील घडामोडीने अधोरेखित झालेली बाब म्हणजे शरद पवारांची राजकारणातील सद्दी संपली. १९७७ च्या जानेवारीत तुरुंगातून सुटलेल्या मिसाबंदींना आणीबाणी शिथिल केली आहे. उठवलेली नाही हे लक्षात ठेवा,