आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामीजींच्या वाटेने चालणारे- शिवशंकरभाऊ पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातीलच नव्हे, जगातील युवापिढीला आदर्श वाटणारे विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आजही आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व धर्म एकच अंतिम उद्दिष्टासाठी आहे, एकाच मार्गाचे वाटसरू आहेत. सर्व धर्मांनी अधर्माशी लढायचे आहे. असे सर्व धर्मांमध्ये अनुपम स्नेहबंध निर्माण करणारे स्वामीजींचे उद्गार अजरामर झाले आहेत.

या विचारांचा सेवाकार्यात उपयोग करून कार्यरत असलेले कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनातून संस्थानाचे काम सुरू आहे. ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या ध्येयाने प्रेरित झालेले शिवशंकरभाऊ पाटील संस्थानचे सर्वेभुन्तुसुखिना: हे संस्थानचे ब्रीद घेऊन ‘सेवा हीच साधना’ या प्रेरणेने अनेक प्रकल्पांमधून कार्यरत आढळून येतात.

भाऊंची कार्यतत्परता आणि श्रद्धा तसेच प्रत्यक्ष कृतीतून मानवतावादी दृष्टिकोनाचा परिचय घडून येतो. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४२ प्रकारच्या सेवायोजना महाराजांच्या कृपेने सुरू आहेत. शेगाव परसिरात असलेली संस्थानची भक्तनिवास १ ते ६ आनंदविहार, आनंदवसिावा अशी हजार खोल्यांची व्यवस्था येथे येणाऱ्या भक्तांसाठी आहे.

श्री भाऊंच्या संकल्पनेतून साकारलेला ३०० एकर परसिरातील आनंदसागर प्रकल्प हा महाराजांच्या कृपाशीर्वादाने सुरू आहे. याचबरोबर गोरगरीब रुग्णांची सेवा, फिरते दवाखाने, आदिवासी भागात सेवाकार्य, मूकबधिर विद्यालय, वारकरी शिक्षण संस्था, अध्यात्मज्ञानाची पंढरपूर वारी असे अनेक सेवाप्रकल्प संस्थानच्या वतीने सध्या सुरू आहेत. जवळपासच्या १४४ खेड्यांमध्ये आरोग्यसेवा प्रकल्प सुरू आहेत. १२ जानेवारीला भाऊंचा अमृतमहोत्सवी जन्मदिवस आहे. गेल्या ५० वर्षांपासून महाराजांचे काम नसि्पृहपणे सुरू आहे. भाऊंचे आशीर्वाद लाभत राहोत आणि त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो, हेच संत गजानन महाराजांकडे मागणे...