आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचा-निगा : ओव्हरनाइट मास्क निवडताना चिकित्सक, जागृत राहणे गरजेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्वचेला सुंदर व तजेलदार ठेवण्यासाठी ओव्हरनाइट फेस मास्क लावणे लाभदायी ठरू शकते. दिवसभरातील प्रदूषण व सूर्याच्या झळांनी त्वचेचे सौंदर्य कमी होत जाते. ओव्हरनाइट फेस मास्क प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असते. यातील बहुतांश मास्क तेल विरहित असतात. त्वचेचे आतपर्यंत नुकसान झालेले असल्यास, मास्कने त्यावर उपचार होतो. हे मास्क रात्रीच्या वेळी वापरावेत. त्यामुळे अतिनील किरणांपासून मास्कचा बचाव होतो.
मास्क वापरण्याची पद्धत- मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. प्रदूषणामुळे त्वचेवर मृतघटक तयार होतात. त्यामुळे सर्वप्रथम चेहरा स्वच्छ करा. मास्क लावताना काही वेळ चेह-याला त्याने मसाज द्या. त्यामुळे ते त्वचेच्या खालच्या भागातही झिरपेल. झोपायला जाण्याच्या अर्धातास आधी मास्क लावा.
अन्यथा सर्व मास्क उशीलाच लागेल.मास्क खरेदी करण्यापूर्वी त्वचेचा पोत जाणून घ्या. पॅकवर लिहिलेले लेबल व घटकद्रव्ये याविषयी सविस्तर वाचूनच मास्क खरेदी करा. मास्कमध्ये तुमच्या त्वचेला अनावश्यक घटक असण्याची शक्यता असते. मास्क चेह-यावर ६ ते ८ तास असतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही घटकांविषयी कळत नसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमची त्वचा शुष्क असल्यास हायड्रेटिंग घटक, जसे व्हिटॅमिन ए, सी वा सोया असलेले मास्क वापरा.

त्वचेवर पुरळ, व्हाइटहेड, ब्लॅकहेड जास्त असतील तर मास्क वापरणे टाळा. सुरकुतलेपण व त्वचा काळवंडत असल्यास रेटिनॉल, एएचए, ग्लायकोलिक, लॅटिक, मँडेलिक, व्हिटॅमिन ए व सीचा वापर करा. शक्यतो रासायनिक द्रवयुक्त मास्क वापरू नका. ओव्हरनाइट मास्क ६ ते ८ तास चेह-यावर असतो त्यामुळे ऑर्गेनिक द्रवांचा मास्क वापरावा.