आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्वचा आणि केसांची काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर भारतात थंडी जास्त आहे; परंतु मध्य प्रदेशात तेवढी नाही. अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये प्रवासात सुंदर दिसण्याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. समजून घ्या त्याविषयी...
-बीचसाठी : इंडियन स्किनमध्ये टॅनिंग लवकर होऊन जाते. त्यामुळे डाग सहज दिसायला लागतात. या उपायाचा आपल्याला लाभ होईल.
-क्लीनिंग : ‘पीएच बॅलन्स्ड फेसवॉश’ या शॉवर जेलचा वापर करा. कारण इतर फेसवॉशमध्ये ड्राइंग इफेक्ट अधिक असू शकतो.
-सन प्रोटेक्शन : वॉटर रझिस्टन्स एसपीएफ-५० या सनस्क्रीनला दर २ ते ३ तासांनंतर चेहरा आणि शरीरावर लावा. उच्च एसपीएफवाला लिप बामही त्यासाठी लाभदायक राहील.
-नाइट क्रीम : स्किन लाइटनिंग ओटीसी क्रीम लावा. मात्र, ज्यात आरबुटिन, विटामिन-सी, मलबरी, लिकोराइस यासारखी तत्त्वे असावीत.
-केसांचे नुकसान टाळा : क्लोरीन कमी करणारे शाम्पू आणि पोस्ट सन हेयर मास्कमुळे केसांना झालेले नुकसान कमी करता येऊ शकते.

डोंगराळ भागासाठी...
डोंगराळ भागात यू.व्ही. रेंज अधिक असते. त्यामुळे अधिक सन प्रोटेक्शनची गरज पडते. त्यासाठी क्लीनिंग, सनस्क्रीन आणि नाइट क्रीम वरील भागात लावा. मात्र, एक गोष्ट लक्ष ठेवा की, या तिन्ही बाबी क्रिमी बेसमध्ये असाव्यात.
-बॉडी बेसिक्स : कोको किंवा शिआ बटर असलेले बॉडी लोशन लावा. तसेच प्लांट ऑइल किंवा विटामिन-‘ई’युक्त शाम्पू वा कंडिशनर लावल्याने लाभ मिळतो.

उष्ण वातावरणासाठी...
उष्ण भागात त्वचेवर लाइट मॉइश्चरायझर व अधिक सन प्रोटेक्शनची गरज पडते.
-आवश्यक बाबी : फोमिंग फेसवॉशमुळे अधिक लाभ मिळेल.हे लावल्यावर १० मिनिटांनी त्वचा ताणल्यासारखी वाटू लागल्यास क्रिमी बेस फेसवॉशचा उपयोग करा.