आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शक्ती: मुलीला क्रिकेटर बनवण्यासाठी शेती विकली, मुलीला भारतीय संघात स्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
०स्नेह राणा : अष्टपैलू क्रिकेटपटू
> जन्म - 18 फेब्रुवारी 1984
> वडील - भगवानसिंह राणा
चर्चेत असण्याचे कारण : नुकतीच भारतीय महिला एकदिवसीय संघात निवड.
स्नेह राणा ही फलंदाजी आणि ऑफ ब्रेक स्पिन गोलंदाजीमध्ये पारंगत आहे. त्यामुळेच तिला भारतीय महिला संघात प्रवेश मिळाला. 19 जानेवारीला विशाखापट्टणम येथे श्रीलंकेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच तिने उत्कृष्ट कामगिरी केली. 6 षटकांमध्ये 4 निर्धाव षटके टाकत तिने केवळ 7 धावा दिल्या. एक बळीही मिळवला. पुढच्या दोन सामन्यांमध्येही तिने कामगिरीतील सातत्य कायम ठेवले.
डेहराडूनजवळील सिनोला गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेली स्नेह हिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती मुलांबरोबर क्रिकेट खेळायची; पण पुढील प्रवास अत्यंत खडतर होता. ती 9 वर्षांची असताना डेहराडूनच्या लिटिल मास्टर्स क्रिकेट अकादमीने एक सामना आयोजित केला होता. त्या सामन्यातील कामगिरी पाहून प्रशिक्षक नरेंद्र शाह आणि किरण शहा यांनी तिला क्लबमध्ये प्रवेश दिला; पण कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. स्नेह वडिलांची जुनी सायकल घेऊन 12 किलोमीटर अंतरावर असणा-या क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे धडे गिरवायची. पण उत्तराखंडमध्ये जास्त संधी नव्हत्या. स्नेह 16 वर्षांची असताना मुलीचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे वडील भगवानसिंह राणा यांनी एक मोठा निर्णय घेतला. संपर्ू्ण शेती विकून ते हरियाणामध्ये स्थायिक झाले. मुलीला अपयश आले तर कुटुंबाचे काय होणार, याचा तीळमात्रही विचार त्यांनी केला नाही.
दोन वर्षे हरियाणामध्ये राहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अमृतसरला स्थलांतरित व्हावे लागले. पुढे स्नेहने पंजाबमधून खेळण्यास सुरुवात केली व तिच्या कारकीर्दीला गती मिळाली. ती पंजाबच्या 19 वर्षांखालील संघाची कर्णधार बनली. स्नेह ही हरमनप्रीत भुल्लरनंतर भारतीय संघात प्रवेश मिळवणारी पंजाबची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. माझी कारकीर्द घडवण्यात सर्वात मोठा वाटा वडिलांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी सर्वकाही पणाला लावले, असे स्नेह सांगते.