आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूमकेतूवर उतरणार पहिल्यांदाच अवकाशयान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिचर्ड ब्रान्सन यांच्या कंपनीचे यान नष्ट झाल्याच्या काही दिवसांनंतर अंतराळविज्ञानाच्या क्षेत्रात एक चांगली बातमी येऊ शकते. युरोपियन अंतराळ संस्था (ईएसए) १२ नोव्हेंबरला एका धूमकेतूवर संशोधन यान उतरवू पाहत आहे. अशा पहिल्या अभियानावर दहा वर्षांपासून काम सुरू आहे. त्यातून सूर्यमालेच्या उत्पत्तीसंबंधी काही धागेदोरे मिळू शकतात.

धूमकेतूंना जुन्या सूर्यमालेची हाडे समजले जाते. सूर्यापासून खूप दूर अंतरामुळे डीप फ्रीजमध्ये त्यांचे मेकअप सुरक्षित आहे. चुरियूमोव-जेरासिमेन्को किंवा ६७ पी हा धूमकेतू वरुण ग्रह (नेपच्यून) च्या कक्षेच्या मागे बर्फाळ वस्तूंच्या विशाल क्षेत्र कुइपर पट्ट्यातून आला आहे. ईएसएचे रोसेटा अंतराळयान ६७ पी सोबत उडत आहे. त्याने त्याच्या वायूंच्या अनेक नोंदी घेतल्या आहेत. अंतराळयानाने सोडला जाणारा लहान यान फिले (लँडर) धूमकेतूच्या पृष्ठभागावर हळुवार उतरेल. फिले महाविस्फोटाच्या (बिग बँग) काही वेळेनंतर ब्रह्मांडातील स्थितींबद्दल माहिती देऊ शकतो. फिले फक्त दिवसांपुरते पूर्ण क्षमतेने काम करेल. पुढच्या वर्षी रोसेटा ६७ पीबरोबर आपले उड्डाण सुरू ठेवेल.

काय आहे अंतराळयानात
ऑर्बिटर – रोसेटा एक वर्षापर्यंत ६७ पी ला प्रदक्षिणा घालेल. सूर्याकडे झेपावताना धूमकेतूच्या पृष्ठभाग आणि वातावरण बदलाकडे लक्ष ठेवले जाईल. प्रकाशाच्या वेगाने चालल्यानंतरही कुठलीही माहिती पृथ्वीवर पोहोचायला तीस मिनिट लागतील. त्याचे ४६ फुटांचे सोलर पॅनल नेहमी सूर्याकडे राहतात. ऑर्बिटरपासून वेगळे होऊन लँडर १४ मैल खाली धूमकेतूच्या पृष्ठभागावर पोहोचेल लँडर– फिलेमध्ये दहा रिसर्च टूल आणि एक ट्रान्समीटर आहे. हा रोसेटाला डेटा पाठवेल. फिले विविध क्षेत्रांचे नमुने घेण्यासाठी फिरू शकतो. एक मॉनिटर चुंबकीय क्षेत्र आणि सौर वायुंचा अभ्यास करेल. मुख्य बॅटरी संपल्यावर सोलर सेल सूर्याच्या प्रकाशापासून ऊर्जा घेईल. उलट्या दिशेला झाल्यावर रोसेटा आणि फिले एकमेकांना रेडिओ सिग्नल पाठवतील. लँडर सामान्य माणसापेक्षाही लहान आहे.

आपण काय शिकणार– हे अभियान सूर्यमालेचे गूढ सांगण्यासोबतच पृथ्वीवरील सृष्टीच्या संबंधी आपल्याला माहिती देऊ शकतो. धूमकेतूंनी आपल्या ग्रहावर पाणी, बर्फ आणि सेंद्रिय रसायन आणल्याचे मानले जाते. ६७ पीच्या बर्फाच्या विश्लेषणाने या सिद्धांताला पुष्टी मिळू शकते.

आकड्यांचा प्रवास
- रोसेटाला धूमकेतूजवळ पोहोचायला १० वर्षे लागली.
- आतापर्यंत ४ अब्ज मैल त्याने केला आहे.
- रोसेटा तीन वेळा पृथ्वी आणि एकदा मंगळ ग्रहाच्या जवळून गेला आहे. या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने रोसेटाचा वेग ताशी ३४५०० मैलांचा झाला.