आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाळ्यातील फॅशन ट्रेंडला निसर्गसौंदर्याची प्रेरणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा तोंडावर आलाय. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही ऋतू बदलताच नवी फॅशन येईल. गेल्या काही वर्षांपासून प्रिंटने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. या वेळी प्रिंट्समध्ये नावीन्य दिसून येईल. फॉर्मल ड्रेसमध्ये प्रिंटची छाप असेल. यात नेचर-इन्स्पायर्ड प्रिंट्स, अ‍ॅक्वा-अ‍ॅनिमल प्रिंट्स अशा थीम डिझाइन दिसून येतील. डिझायनर राजदीप रनावत यांनी गाऊन, इव्हिनिंग ड्रेसवर काही प्रयोग केले आहेत.

फॅशनजगतात प्रिंट्सचा वेगाने प्रसार होत असून लहान-मोठ्या प्रिंट्स मुलींना आकर्षित करत आहेत. अरुबा ब्ल्यू, रासबेरी, कोरल, पॅराकीट ग्रीन व यलो कलरवर डिझायनर प्रयोग करत आहेत. फ्लोई फॅब्रिकमध्येच नव्हे, तर सिल्क, सिल्क शिफॉन, सॅटिन आणि जॉर्जेटमध्ये सुंदर प्रिंट दिसताहेत. या प्रिंट्स परिधान केल्यास ग्लॅमरस आणि एलिगंट लूक मिळतो. डिझायनर राजदीप राणावत यांनी नेचर-इन्स्पायर्ड (निसर्गप्रेरित) प्रिंट्समध्ये ‘संतुरिनी’ डिझायनिंग लाइन तयार केली आहे. यात सुदिंग प्रिंट्स दिसतील.


मेटॅलिक बटन, पर्लचा वापर
राणावत यांनी गाऊन, काफतान, बोलेरो जॅकेटचे विशेष पीस तयार केले आहेत. त्यांनी आपल्या डिझाइनमध्ये ब्राइट कलर आणि बोल्ड प्रिंट्सचा वापर केला आहे. त्यातून उन्हाळ्यात सहजपणे चांगला लूक मिळेल. त्यांनी डिझायनिंग लाइन ‘संतुरिनी’मध्ये हायलायटिंगसाठी पर्ल, मेटॅलिक बटन, स्वरोस्की आणि मेटल चेनचा वापर केला आहे. प्रिंट्समध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.


कपड्यांवर निसर्ग अवतरला
राजदीप यांनी तीन वर्षे पॅरिसमध्ये काम केले. प्रिंट्सबद्दल त्यांचे प्रेम व ओढ याच काळात प्रकट झाले. राजदीप म्हणतात की, ते जन्मजात कलावंत आहेत. त्यांनी कॅनव्हासऐवजी कपड्यांवर आर्टवर्क करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील वेगवेगळे देश फिरणे त्यांना आवडते. ते जेथे जातात तेथील सौंदर्य कपड्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. त्यापूर्वी ते निसर्गाकडे पाहतात आणि तो समजून घेतात. त्यामुळे आर्टवर्कमध्ये निसर्गाचे बारकावे दिसून येतात. त्यांना कशिदाकारी, टेक्श्चर व ड्रेप्सचीही माहिती मिळते.


प्रिंट्स नेसण्याची नवी शैली
राजदीप म्हणतात की, प्रिंट्स परिधान करण्याची एखादी योग्य किंवा अयोग्य पद्धत नाही. ते कुठल्या कायदा-नियमांचेही पालन करत नाहीत. ते फक्त एकच गोष्ट लक्षात घेतात- एक प्रिंट दुस-या प्रिंटसोबत वापरत नाहीत. सिंगल कलरसोबत प्रिंट वापरण्याचा सल्ला ते देतात. उदाहरणार्थ प्रिंटेड शर्ट, ट्यूनिक व कुर्ता व्हान कलर लेगिंग, जीन्सवर घालावा. तसेच लेगिंग, स्लॅक्स, स्कर्ट वा पलाझोचे प्रिंट असेल तर सॉलिड कलर टॉप छान दिसेल. त्यावर प्रिंटेड स्कार्फ, सँडल किंवा बॅगमुळे चांगला लूक मिळेल.