आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Adventure: १६ तास बाइक चालवली, महिन्यात लंडनहून भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत शेट्टी : बाइकर
* वय : २९ वर्षे
*आई-वडील : इडा आणि जयंत शेट्टी
*शिक्षण : ब्रिटनमध्ये मोटार स्पोर्ट््स इंजिनिअरिंगमध्ये पदवी
*चर्चेत : लंडन ते बंगळुरू बारा हजार किमी अंतर एका महिन्यात बाइकवरून पूर्ण

लंडनहून २५ ऑक्टोबरला निघालेल्या सुशांतने आपल्या हायबुसा बाइकवरून ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवेनिया, क्रोएशिया, सर्बिया, बुल्गारिया, तुर्कस्तान, इराण १५ दिवसांत ओलांडले होते. युद्धग्रस्त इराणमध्ये त्यांच्याभोवती लोक जमा होत होते. त्यामुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरवर गेल्यावर निर्बंधामुळे ते बंद असल्याचे त्यांना कळले. कोणाला इंग्रजी कळत नव्हते, तरीही काहींनी निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. जर्मनी, इराण आणि तुर्कस्तानमध्ये रस्त्यावर दिवे नव्हते. स्लोव्हेनियापासून बल्गेरियापर्यंत रस्ता मोकळा मिळाल्यानंतर त्याने सलग १६ तास बाइक चालवली. नोव्हेंबरच्या अखेरीस तो मुंबईत पोहोचला. बंगळुरूपासून काही अंतरावर
मंजेश्वरमध्ये वरकडीजवळ भावंतकोरीमध्ये वडील जयंत व आई इडा राहतात. इंग्लंडमध्ये मोटर स्पोर्ट््स इंजिनिअरिंगमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतले आहे. ब्रिटनच्या फोर्ड कंपनीत तो सध्या नोकरीही करत आहे. प्रवासात बाइकने कोठेही दगा दिला नाही, केवळ एक वेळेस ब्रेक शू बदलण्याची आवश्यकता भासली. गोव्यात पुढील वर्षी इंडिया बाइक वीकअंतर्गत बाइकचे प्रदर्शन होईल. कमी वेळेत लांब पल्ला गाठण्यासाठी सुशांतने अनेक बाइक्सची चाचणी केली,
मात्र सरतेशेवटी हायबुसाला पसंती दिली. तो वयाच्या सातव्या वर्षापासून बाइक चालवत आहे. जगातील सर्वात कठीण मोटरस्पोर्ट रेड-द-हिमालयामध्ये त्याने २००६ मध्ये भाग घेतला होता. बाइकवर आशिया आणि युराेप फिरलेल्या सुशांतच्या डोक्यात गेल्यावर्षी लंडनहून बंगळुरूला येण्याचा विचार आला होता. त्याने वर्षभरात ही मोहीम फत्ते केली.