आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग बदलणारी कंपनी: २० डॉलरने सर्वात मोठ्या पॅकेजिंग कंपनीची सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विफ्ट अँड कंपनी
संस्थापक: गुस्ताव फ्रँकलिन स्विफ्ट
मुख्यालय: कोलोरॅडो
स्थापना: 1855

मेसॅच्युसेट्स येथील केप कॉडमध्ये जन्मलेल्या गुस्ताव फ्रँकलिन स्विफ्ट हे भावाच्या मासेमारीच्या व्यवसायात हातभार लावत असत, पण आपल्या बळावर काही नवे करण्याची त्यांची इच्छा होती. न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांना बिझनेस सुरू करायचा होता. त्या वेळी ते फक्त १६ वर्षांचे होते, त्यामुळे घरीच राहून काहीतरी करावे, असे वडिलांना वाटत होते. त्यांनी मुलाची इच्छा जाणली आणि स्वत:कडील भांडवल लावण्याचा प्रस्ताव ठेवला, पण फ्रँकलिन यांनी केप कॉड येथेच राहण्याची अट घातली. अशा प्रकारे वडिलांनी दिलेल्या २० डॉलरपासून फ्रँकलिन यांनी १८५५ मध्ये स्विफ्ट अँड कंपनीची सुरुवात केली.

२० वर्षांनंतर १८७५ ते शिकागो येथे आले. व्यवसाय विस्तार करून दूरवरील राज्यांमध्ये मांस पुरवण्याची त्यांची इच्छा होती, पण त्या वेळी अमेरिकेतील रेल्वेचे जाळे पूर्णपणे विकसित झाले नव्हते. फ्रँकलिन यांनी यासाठी मांसाचे पॅकेजिंग करायला सुरुवात केली. मात्र, हे पॅकेजिंग हिवाळ्याच्या दिवसात शक्य होते. कारण रेल्वेमध्ये रेफ्रिजरेटरची सुविधा नसते. उन्हाळ्यात मांस खराब होण्याची भीती होती. स्विफ्ट यांनी स्वत:च रेफ्रिजरेटेड कारची निर्मिती केली आणि तिचे पेटंटदेखील मिळवले.

१९०० च्या आसपास कंपनीचा व्यवसाय अमेरिकेबाहेरही विस्तारू लागला. कंपनी मांसासह इतर व्यवसायातही पाय रोवू लागली. १९२२ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती आणि १९२६ मध्ये कंपनीकडे पाच हजाराहून अधिक रेफ्रिजरेटेड कार होत्या. ३० च्या दशकात मंदीमुळे परिस्थिती बिघडली. स्विफ्टला आपले कामकाजावर मोठ्या प्रमाणात हात आखडता घ्यावा लागला. मात्र मंदीनंतर कंपनीने पुन्हा झएप घेतली. ५० च्या दशकापर्यंत स्विफ्ट अँड कंपनीचा व्यवसाय सतत वाढत होता. दुस-या महायुद्धादरम्यान कंपनीचे २० हजारांहून अधिक कर्मचारी होते. १९२ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल १.४ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त होती.

१९८२ मध्ये कंपनीचे नाव बदलून स्विफ्ट इंडिपेंडंट पॅकिंग कंपनी असे ठेवण्यात आले. त्या वेळी ती अमेरिकेतील सर्वात मोठी मांस पॅकेजिंग कंपनी होती. १९८७ मध्ये कॉन एग्रा फूड्स इंक यांनी कंपनीचे ५० टक्के शेअर्स खरेदी केले. दोन वर्षांनंतर उर्वरीत शेअर्स खरेदी करुन कंपनीने ताबा मिळवला. कॉन एग्रा फूडचे प्रॉडक्शन आणि मार्केटिंग क्षेत्रातील मोठे नाव होते. या कंपनीत अनेक कंपन्या विलीन झालेल्या होत्या.

स्विफ्ट अँड कंपनीचा नफा सतत वाढत गेला. कॉन अ‍ॅग्रा मॅनेजमेंटने तिच्या विस्तारासाठी अधिक गुंतवणूक करायला सुरुवात केली. १९९० च्या दशकात कंपनीच्या आधुनिकीकरणासाठीही अनेक प्रयत्न करण्यात आले. कंपनीच्या दोन प्लांट्सला आयएसओ सर्टिफिकेट मिळाले आणि हे यश मिळवणारी ही पहिली अमेरिकन कंपनी ठरली. दरम्यान २००२ मध्ये कॉन अ‍ॅग्रा फूड्स कंपनीचे ५४ टक्के शेअर्स नव्या समूहाला ट्रान्सफर करण्यात आले. २००७ मध्ये कंपनीचे मालकी हक्क जेबीएस एसए कडे आले. ही जगातील सर्वात मोठी मीट प्रोसेसिंग कंपनी ठरली.