आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल‍िकॉन व्हॅलीचे महारथी मागत आहेत वेगळे राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिकॉन व्हॅलीचे नवे संशोधन एखादी कंपनी, गॅजेट किंवा अ‍ॅप नाही. व्हॅलीला नवे राज्य बनवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. हॉटमेल आणि स्काइपसारख्या प्रॉडक्टला फंडिंग करणा-या श्रीमंत व्हेंचर भांडवलदार टीम ड्रेपर म्हणतात, कॅलिफोर्निया राज्य सहा भागांत विभाजन केले जावे. त्यातील एक राज्य सिलिकॉन व्हॅली असेल. ते सॅन फ्रान्सिस्कोच्या आखाती भागापासून सेन जोसपर्यंत असेल. मुद्याला मतदारांच्या समोर ठेवण्यासाठी आवश्यक सह्या गोळा झाल्या.

वेगळे सिलिकॉन व्हॅली राज्य अमेरिकेचे सर्वांत संपन्न राज्य असेल. त्याचे दरडोई उत्पन्न 38 लाख रुपये असेल. वेगळ्या राज्याची मागणी व्हॅलीची उदार आणि मुक्त जीवनशैलीनेदेखील प्रेरित आहे. ही ती जागा आहे जेथून पॉलचे संस्थापक पीटर थिल समुद्रात एक स्वर्गाच्या रचनेसाठी पैसे लावत आहेत. व्हेंचर भांडवलदार बालाजी श्रीनिवासन प्रयोगांसाठी स्वतंत्र स्थान बनवू इच्छितात. एलोन मस्कची योजना मंगळ ग्रहासारखी कॉलनी बनवण्याची आहे.सिलिकॉन व्हॅलीत जिमेलपासून जीन थेरपीने जन्म घेतला आहे. परंपरा आहे की, चांगल्या कल्पना, रितीरिवाज वा सध्याच्या नियमांपेक्षा वेगळ्या असतात. तसे सिलिकॉन व्हॅलीने असाधारण प्रॉडक्ट बनवले आहेतच.