जगात या क्षणी नशेशी संबंधित सर्वात गुंत्याची समस्या मेथ, कोकेन किंवा हेरॉइनची नशा नाहीये. तसेच अफूपासून बनणा-या हेरॉइनने पुन्हा डोके वर काढले आहे. हॉलिवूड अभिनेता फिलीप सीमोर हॉफमनचा मृत्यू याचे उदाहरण आहे. अर्थात, सिंथेटिक ड्रग्ज किंवा डिझाइनर ड्रग्ज सध्याची गंभीर समस्या बनली आहे. ते अमेरिकेत वैध मानले जाते. अमली पदार्थांवर नजर ठेवणारे अधिकारी सांगतात, याचा प्रचार असामान्य वेगाने होत आहे. अमेरिका ड्रग्ज एन्फोर्समेन्ट एजन्सीचे प्रमुख जोसेफ रेनाजिसी सांगतात, हे प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहे.
या अमली पदार्थांची नावे के-2 किंवा स्पाइससारखीदेखील आहेत. अमेरिकेत ते खुलेआम दुकानांमध्ये विकले जात आहेत. त्यांचा प्रसार पाहून लोकप्रतिनिधी उपायांसाठी विचार करू लागले आहेत. सीनेटर एमी क्लाउबुचर सांगतात, आम्हालाही अवैध वस्तूंचा व्यवसाय करणा-या ठगांचा आणि ड्रग्ज डीलर्ससारखे चतुर व्हावे लागेल. त्यांनी सिंथेटिक ड्रग्ज गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी एक विधेयक सादर केले आहे.
काय आहे सिंथेटिक ड्रग्ज ?
सिंथेटिक ड्रग्ज विशेषत: आशियामध्ये बनवले जातात. प्रयोगशाळांमध्ये केमिस्ट रसायने (केमिकल कम्पाउंड) मिसळून ते बनवतात. त्यांचा उद्देश मारिझुआना (भांग, चरस) आणि कोकेनसारख्या नैसर्गिक वस्तूंच्या परिणामांची नक्कल करणे आहे. हे कायद्याच्या चौक टीत येतात. अमेरिकेत नवे केमिकल कम्पाउंड राज्य व केंद्र सरकारच्या अवैध ड्रग्सच्या यादीत येत नाहीत. त्यामुळे ते कायदेशीररित्या विकले जाऊ शकतात. बंदी घातलेल्यांच्या यादीत एखादे कम्पाउंड सामील झाल्यास केमिस्ट फॉर्म्युल्यात थोडाफार फेरबदल करून नवीन पदार्थ बनवतात. ते कायदेशीर असते.
सिंथेटिक ड्रग्जचा प्रभाव त्या पारंपरिक अमली पदार्थांच्या एकदम वेगळेसुद्धा असू शकतात ज्यांची ते नकल करतात. ग्लास क्लीनर व बाथरूम स्वच्छ करणारे पांढरी पावडर देखील सिंथेटिक केथिनोन्स आहे. कोकेन किंवा मेथसारखे करण्यासाठी वासाने, चघळून किंवा इंजेक्शनद्वारे ते घेतले जाऊ शकते. परंतु, हुक्का, चिलमच्या (पॉट) रूपात प्याल्या जाणा-या केमिकल्सची मोठी मागणी आहे. सिंथेटिक कॅनाबिनॉइड्स मेंदूवर तसाच परिणाम करतात जसा मारिझुआनामध्ये होतो. ते एका रोपट्याच्या पानांवर शिंपडले जाते. लोक ते विकत घेऊन पितात.
कॅनाबिनॉइड्स सर्वाधिक लोकप्रिय सिंथेटिक आहे. अमेरिकेत पॉटच्या वाढत्या कायदेशीर मान्यतेने या काल्पनिक धारणेला प्रेरणा मिळेल की, हे केमिकल्स हानिकारक नाहीत. परंतु त्यांचे प्रभाव धोकेदायक आणि छुपे आहेत. सिंथेटिक ड्रग्सच्या सेवनाने किडनीचे विकार आणि मानसिक समस्यांची प्रकरणे पुढे येत आहेत. लोक सिंथेटिक पॉटचा वापर यासाठीही करतात की, युरीन टेस्टमध्ये ते ओळखले जात नाही. कॅनाबिनॉइड्सची वाजवी किंमत ते वैध आणि सुरक्षित असल्याच्या धारणेमुळे किशोरवयीनांमध्ये त्याचा उपयोग वाढला आहे.
पोलिस व इतर संस्थांकडून सिंथेटिक ड्रग्सवर बंदी घालण्यास अनेक व्यावहारिक अडचणींचा तोंड द्यावे लागते. अवैध ड्रग्सची खरेदी-विक्री गुप्तपणे होते. दुसरीकडे सिंथेटिकची विक्री जनरल स्टोअर, पेट्रोल, गॅस पंप आणि इतर दुकानांत पॅकेटमध्ये सर्रास होते. घरात कामी येणारे प्रॉडक्ट जसे वनस्पतींचे खत, सुगंधी वस्तू आणि बाथरूम क्लीनरच्या रूपात सिंथेटिक ड्ग्स विकले जातात.
त्यावर लिहिलेले असते : ‘मानवाच्या उपयोगाचे नाही’
अमेरिकेत सिंथेटिक ड्रग्सच्या प्रचलनावर नजर ठेवण्यासाठी टेक्सास राज्यातील शहर अमारिल्लोच्या उदाहरणावर नजर टाका. येथे 10 ते 50 डॉलरदरम्यान ड्रग्स मिळतात. 2013 च्या सर्वेक्षणात लक्षात आले की, इयत्ता सहावी ते बारावीच्या 11 टक्के विद्यार्थ्यांनी सिंथेटिक मारिझुआनाचा वापर केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पोलिसांनी प्लॅनेट-एक्स नामक एक दुकानावर छापा टाकून गोरिल्ला ड्रो पो पो ब्रँड नावाच्या सिंथेटिक ड्रगच्या 92 पॅकेट जप्त केले होते. पोलिसांना जिल्हा अॅटॉर्नी कार्यालयात प्रकरण सादर केले; मात्र गोरिल्ला ड्रो पो पो बेकायदा असल्याचा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे खटला चालला नाही.
जून 2013 च्या एक युवक जेसीच्या अचानक मृत्यूचे कारण सिंथेटिक ड्रग्सचे सेवन राहिले आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये याची पुष्टी झाली आहे. जेसीची आई रोनी केननला विश्वास आहे की, प्लॅनेट एक्सने विकण्यात आलेल्या कॅनाबिनॉइड्सने तिच्या मुलाचा जीव घेतला आहे. त्यांनी प्लॅनेट एक्सविरुद्ध खटला दाखल केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सिंथेटिक कॅनाबिनॉइडचा एक डोससुद्धा धोकेदायक ठरू शकतो. वनस्पतींच्या पानांवरील रसायनांच्या अनियंत्रित वापरामुळे एखाद्या प्रसंगी रसायनाचे प्रमाण अति होऊ शकते. अशा उत्पादनाचा धूर ओढणे जीवघेणा ठरू शकतो.
सिंथेटिक ड्रग्सच्या प्रभावांवर झालेल्या
मर्यादित संशोधनांचे परिणाम चिंताजनक आहे. जानेवारी 2014 मध्ये फोरेन्सिक सायन्स रिव्ह्यूमध्ये प्रकाशित अभ्यासात सांगण्यात आले, कॅनाबिनॉइड्ससारख्या वस्तंूमुळे मानसिक समस्या, ऊतींना हानी आणि काही मृत्यूच्या घटनांचे पुरावे मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर जीवघेण्या सिंथेटिक ड्रग्सचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.
जानेवारीत सिंथेटिक मारिझुआनाचा परिणाम झालेली 177 प्रकरणे विष नियंत्रण केंद्रांमध्ये आली.
2013 च्या पूर्वी सहा महिन्यांत पाच कोटी दहा लाख डॉलरचे सिंथेटिक ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
बहुतांश सिंथेटिक ड्रग्सची निर्मिती आशियामध्ये होते. कित्येक देशांमध्ये हे कायदेशीर आहे.
यूपीएस फेड एक्स यांसारखी कुरियर सेवांच्या द्वारे ड्रग्स अमेरिकेत पाठवले जात असतात.
अमेरिकेने चीनकडून सिंथेटिक निर्यात रोखण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.