आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On T.N.Suresh Kumar, Divya Marathi, ISRO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Achievement: इस्रोच्या शास्त्रज्ञाची स्वकमाईच्या ५० लाखांतून ११० देशांची सहल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी. एन. सुरेश कुमार : इस्राचे शास्त्रज्ञ
> जन्म : 18 जुलै 1957
> शिक्षा : इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग.
> कुटुंब : पत्नी गीता इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. मुलगी रक्षा टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
* चर्चेत : सुरेश कुमार पृथ्वीच्या वातावरणातील दुसरा स्तर स्ट्रेटोस्फिअरमध्ये जाणारे पहिले भारतीय आहेत.
अंतराळ जवळून पाहण्याची इच्छा सुरेश यांच्या मनात लहानपणापासून होती. इस्रोमध्ये १९८७ मध्ये दाखल झाल्यानंतर १९८५ मध्ये त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार होते. अंतराळात जाणा-या चारसदस्यीय पथकात त्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, फेब्रुवारी १९८६ मध्ये अंतराळ यान "चॅलेंजर'मध्ये स्फोट झाल्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली. सुरेश यांच्यासाठी ही घटना धक्का होती.यातून नंतर त्यांना नवे उद्दिष्ट मिळाले. त्यांनी जगातील सातही खंडांची सहल करण्याचा निर्णय घेतला. याच्या तयारीसाठी त्यांना व त्यांच्या पत्नीस अकरा वर्षे लागली. या काळात त्यांनी वायफळ खर्च थांबवला. हासनमध्ये सरकारी निवासस्थान मिळाले होते, त्यामुळे राहण्यावर खर्च होत नव्हता. त्यांचे जग घर ते कार्यालय आिण कार्यालय ते घरापर्यंत मर्यादित राहिले होते. दोघे दरवर्षी मिळणारी ३० दिवसांची पगारी रजाही विकत होते.
१९९७ मध्ये त्यांनी पत्नी आणि मुलीसोबत पूर्व देशांच्या पहिल्या सहलीचे नियोजन केले. ट्रॅव्हल एजंटकडे बुिकंग केली. पहिल्यांदा थायलंडला गेले. यानंतर महिनाभर हाँगकाँग, मलेिशया आिण अन्य देशांत िफरले. संपूर्ण प्रवासात विमान भाड्याशिवाय एक लाख रुपये खर्च केले. त्यातून त्यांना दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली- वर्षभर पैशांची बचत करा आणि महिनाभर फिरण्यावर खर्च करा. दुसरी- कमी पैशांत प्रवासाचा आनंद घेण्यासाठी ट्रॅव्हल एंजटपासून सावध राहिले पाहिजे. यानंतर त्यांनी सहलीसाठी स्वस्त पडणा-या रात्रीची उड्डाणे आिण मिड वीक फ्लाइट्समध्ये तिकीट बुक केले. पैसे वाचवण्यासाठी डायरेक्ट फ्लाइटऐवजी लांब पल्ल्याला प्राधान्य दिले. स्वस्तातील गेस्ट हाऊस आिण सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये
थांबत असत.
शाकाहारी असल्यामुळे रेडी टू इट अन्नपदार्थ जवळ असे. जिथे जाऊ तिथे रेल्वे व बसनेच प्रवास होई. सर्वात स्वस्त लॉजमध्ये थांबून खाण्यापिण्यावर कमी खर्च यावा यासाठी रेडी टू इट फूड खाण्याला पसंती देत असत. खरेदीचा मोह टाळला जाई. असे केल्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवासाचा आनंद घेता येतो. याच पद्धतीने त्यांनी केवळ ५० लाख रुपयांत आतापर्यंत ११० पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला आहे. पत्नी ८७ देशांच्या प्रवासात, तर मुलगी ४१ देशांच्या प्रवासात बरोबर होती. स्ट्रेटोस्फिअरपर्यंत जाणे सर्वांत मोठे आव्हान होते. त्यामुळे पैशांसोबत फिटनेस, उत्साह, संभाषण कौशल्य खूप आवश्यक आहे. आता ते शून्य वजनाचा अनुभव घेण्यासाठी झीरो-जी फ्लाइटवर जाणार असल्याचे त्यांनी "भास्कर'ला सांगितले.