आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा ग्रुपची पहिली महिला प्रोफेशनल डायरेक्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा ग्रुपआधी फरिदा जागतिक बँकेत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत होत्या. त्या १९८६ मध्ये जागतिक बँकेच्या या विभागाशी जोडल्या गेल्या आणि पेन्शन फंड असेट्स पाहत होत्या. चीनमध्ये हेल्थकेअरची समस्या होती. २१ मार्च २००७ मध्ये चीनची राजधानी बीजिंगमध्ये इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून फरिदा यांना पाठवण्यात आले होते. तेथील हेल्थकेअरच्या ट्रेंडमध्ये बदल घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्य सेवेतील असमानता नष्ट करण्याचा पुरस्कार केला.
त्यासाठी बरीच गुंतवणूक आवश्यक आहे. सरकारकडे तेवढा पैसा नाही अणि तसे शक्यही नाही. त्यांनी तेव्हा खासगी क्षेत्राचा सहभाग आरोग्य सेवेत वाढवण्यावर भर दिला. यानंतर त्यावर वेगाने अंमलबजावणी करण्यात आली आणि त्याला यशही मिळाले.

त्यांच्या या दौऱ्यानंतर आयएफसीने चीनच्या यूनायटेड फॅमिली हॉस्पीटल आणि चांगशा एअर आय हॉस्पिटल ग्रुपशी भागीदारी केली. यासोबत तेथील लोकांना प्रशिक्षण दिले. वैद्यकीय महाविद्यालयांना मदत केली. त्यांच्या कार्यकाळानंतर चीनमध्ये हॉस्पीटलची स्थापना होण्यात विलंब झाल्याने रोखलेली मदत नव्याने सुरू करण्यात आली. यानंतर २००८ मध्ये आशिया, लॅटीन अमेरिकेच्या व्हाइस प्रेसिडेंटम्हणून त्यंाची नियुक्ती झाली. याच पदावरून २००९ मध्ये त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी सार्टिका व्यवस्थापन कंपनी स्थापन केली. जागतिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार कंपनीने त्यांच्याकडे दिले होते.
ही कंपनी आयएफसीमधून निवृत्त झालेल्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केली होती. टाटा सन्सचा विचार करता या कंपनीच्या कार्यकारी मंडळात १९१५ च्या दरम्यान नवाजबाई टाटा कार्यरत होत्या. सर टाटा (जमशेटजी टाटा यांचे कनिष्ठ चिरंजीव)यांच्या त्या पत्नी होत. सर रतन टाटांच्या निधनानंतर त्या संचालक मंडळात सहभागी झाल्या. त्या कुटुंबातील सदस्य होत्या. मात्र, फरीदा कुटुंबाबाहेरच्या आहेत.

पूर्व आशिया,प्रशांत, दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमधील चांगली व्यावसायिक समज असलेल्या फरीदा यांनी जागतिक स्तरावर दीर्घकाळ मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचा अनुभव घेतला आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशननंतर त्या कार्तिका मॅनेजमेंट ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. ग्रुपची गुंतवणूक कुठे आणि कशी व्हावी,याची त्यांना चांगली जाण आहे.