आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण: सत्या नाडेलांची पुरुषप्रधान मानसिकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी प्रमुख सत्या नाडेला यांच्या सोबत त्यांच्याच कंपनीची संचालक महिला, यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत या दोघांनाही एक प्रश्न विचारण्यात आला. समान कामासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये महिला कर्मचा-याला ७८ टक्के कमी वेतन का मिळते? प्रश्न पदोन्नत्ती वा पगाराचा नाही. व्यवस्थापन मला योग्य वेळी योग्य वेतन देईल, या विश्वासाचा आहे, असे यावर नाडेला उत्तरले.

नडेलांचे हे वक्तव्य भारतीय पुरुषांच्या मानसिकतेलाच प्रतिबिंबित करते. नडेलांच्याही व्यक्तित्वात स्त्री-पुरुष असमानता व कर्म विचार चांगलाच मुरलेला आहे. नडेलांचे हे वक्तव्य प्रसारित झाले. अमेरिकेतील महिलांनी फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअ‍ॅपवर याचा जोरदार निषेध केला. टाइम मासिकात या विधानावर व्यंगात्मक लेख छापून आला. या लेखाचा मथळा होता, ‘महिलांनो चेह-यावर सदोदित सुंदर हास्य ठेवा, मात्र जास्त पैसा मागण्याचे अशोभनीय कृत्य करू नका. कारण तुमच्या पुरुष प्रेमीला रिझविण्यासारखे हे कृत्य असेल. तुम्ही त्याचा जितके मागे लागाल, तितके ते तुमच्यापासून जास्त दुरावत जाईल.’

आदर्श स्त्रीची कल्पना पुरुषांनीच तयार केली आणि महिलांनी ती मुकाटपणे स्वीकारलीही. या आदर्श कल्पनेत- सुंदर, समर्पित, सेवा, त्यागाची मूर्ती, प्रेमळ, इतरांची काळजी घेणारी इत्यादींचा समावेश आहे. यात स्त्री ध्यानावस्थेत, स्वतंत्र, आत्मविश्वासपूर्ण कोठेच दिसत नाही. कारण अशा स्त्रीवर पुरुष सत्ता गाजवू शकत नाहीच, उलट त्याच्यात न्यूनभाव निर्माण होतो. सर्व योग, आध्यात्मिक साधना पुरुषांचे शारीरिक-मानसिक सामर्थ्य पाहूनच बनवण्यात आले आहेत. कारण त्याचा रचनाकार पुरुषच आहे.

मात्र, कालचक्र फिरत राहते. यात जो खाली असतो तो वर येतोच. ओशोने स्त्रीच्या जीवनाला आमूलाग्र रूपांतरित केले. स्त्री-पुरुषांसाठी समान ध्यानपद्धती निर्माण केली. ज्या देशात मानवी समाजाचा अर्धा भाग स्वत:ला निम्न व अर्धा उच्च मानतो,तेथे विकास शक्य नाही, असे ओशो सांगतात. स्त्री निन्म असेल तर तिच्या पोटी येणारा पुरुष उच्च ठरू शकत नाही. स्त्रीला निम्न लेखणारा पुरुष कधीच उच्च होऊ शकत नाही.
amrit.sadhana@ dainikbhaskargroup.com