आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaching: रडल्याने मन हलके व ताजेतवाने होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा स्रिया आणि लहान मुले रडतात, तेव्हा लोक हिंदीत रोना-धोना बंद करो, असे म्हणतात. मला असा प्रश्न पडतो की, ‘रोना’ सोबत ‘धोना’ हा शब्द कसा जोडला गेला? ‘धोना’ हा शब्द का जोडला आहे ते स्वत: रडल्यावरच समजते. रडणे काही चांगली गोष्ट नाही. कोणी सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने रडत असेल तर तो रडण्याचा आनंद घेत आहे, असे नाही. कारण रडणे दु:खाशी निगडित आहे. रडणारा काही तरी न मिळाल्याने किंवा दु:खाच्या घटनेशी संबंधित आहे. जोपर्यंत आपण मनापासून रडत नाही, तोपर्यंत आपल्या डोळ्यात अश्रू येणार नाही. अश्रू आल्याने डोळ्यातील घाण निघते आणि डोळे स्वच्छ होतात. तसेच रडण्याने मनातील दु:ख कमी होणे म्हणजेच मनातील घाणसुद्धा दूर होते. रडल्यानंतर इतके हलके वाटते जसे काही आपण अंघोळच केली आहे. यासाठी अश्रूंनी आपल्या मनाचे शुद्धीकरण केले पाहिजे. आरोग्याच्या सुदृढतेसाठी रडणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात लोकांचे अश्रू कोरडे पडले आहेत. आपणास शिकवले गेले आहे की, पुरुष असाल तर रडायचे नाही. कारण रडणे हे स्त्रियांचे कृत्य आहे. लहान मुलांनादेखील असेच शिकवले जाते की, काय रडतोस, तू मुलगी आहेस का?

यावर संशोधक सांगतात की, पुरुषांनीदेखील रडणे शिकले तर जगातील मूर्खपणा कमी होईल. स्त्रियांपेक्षा पुरुष दुप्पट मूर्ख असतात. त्यामुळे आत्महत्या करणा-यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असते. कारण असे आहे की, स्त्री अजूनही रडणे विसरलेली नाही. थोडे रडून घेते आणि विसरून जाते. त्यामुळे थोडा हलकेपणा मिळतो. तिच्या रडण्यामध्ये काही अध्यात्म नसते. क्षुल्लक गोष्टींवरूनही स्त्रियांचे रडगाणे सुरू असते. तरीही तिला यातून हलकेपणाची जाणीव होते. डोके संगणकाच्या जवळही आहे. तेही चांगले काम करते आहे. परंतु हे सत्य आहे की, संगणकाला हृदय नाही. माणसासारखे भाव, संवेदना जाणणारा यंत्र मानव बनवू शकणार नाही. भाव मनुष्याप्राण्यांचा महिमा आहे. तोच फक्त रडू व हसू शकतो. तेव्हा असे रडा की ज्यामुळे मनाला हलकेपणा मिळून मन स्वच्छ होईल.