आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Teaching By Aruta Sadhana, Divya Marathi

पुरुषांच्या जगात स्त्रीचे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेप्सिको कंपनीच्या प्रमुख इंद्रा नुयी यांनी एका मुलाखतीत आपण महिला असण्याची व्यथा नुकतीच उलगडून दाखवली. त्या म्हणाल्या, कुटुंबाचा विचार करत असताना त्यांच्या मनात नेहमीच अपराधीपणाची भावना असते. पुरुषांच्या या जगात एवढी महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना तिला कोणत्या अंतर्द्वंद्वातून जावे लागते, याची कल्पना केवळ दुसरी स्त्रीच करू शकते. हातात काठी घेऊन तारेवर चालण्याची कसरत करताना कधी उजवीकडे, तर कधी डावीकडे झुकते. कसेही करून तिलाच संतुलन सांभाळावे लागते. समाज अणि धर्माने स्त्रीला गृहिणीची भूमिका दिली आहे. त्यात मुलगी, पत्नी, आई, सून ही कर्तव्ये स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहेत.
आता प्रश्न हा आहे की, शिक्षण घेऊन महिला पुरुषांपेक्षाही जास्त सरस ठरत आहेत. आपल्या बुद्धिकौशल्याने कंपनीत प्रमुख पदावर जात आहेत. मग त्यांची नेमकी भूमिका कोणती, हे कोण सांगणार? स्वत:ची भूमिका आणि कर्तव्ये आता महिलाच ठरवणार आहेत. पुरातन शास्त्रांमध्ये या नव्या स्त्रीचा उल्लेखच नाही, कारण त्या वेळी तिचा जन्मच झाला नव्हता. महिलांच्या रस्त्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वत:मधील अपराधीपणाची भावना. याचाच उल्लेख इंद्रा नुयी यांनी केला आहे. घरासाठी कितीही कष्ट घेतले, तरी पूर्ण वेळ कुटुंबासाठी देऊ शकत नाही, यामुळे महिलांना अपराधीपणाची भावना असते; मग कुटुंबातील सदस्यदेखील तिच्याकडे याच भावनेने पाहतात.
महिलांनी हा एकच प्रयत्न करावा. स्वत:च्या मनातील ही सल कायमची काढून टाकावी. हे म्हणणे सोपे आहे, मात्र कृती करणे कठीण आहे. कारण अनेक शतकांपासून आपल्यावर हेच संस्कार करण्यात आले आहेत. कुटुंब स्थापनेत स्त्री स्वातंत्र्याचा विचारच नव्हता. तिच्या गुलामगिरीतच कुटुंबाची भिस्त होती. काम करत असतानाही तिला स्वत:साठी वेळ काढून आत्मविश्वास वाढवावा लागेल. मग घरातील स्त्रीचेही खासगी आयुष्य आहे . हे कुटुंबातील सदस्यांच्या हळूहळू लक्षात येईल. हा प्रवास खूप दीर्घ असला, तरी सुरुवात झाली आहे. महिलांच्या क्षमता व तिच्यामधील गुण विकसित होत आहेत. आता पुन्हा तिला घरात फक्त सेवेक-याची भूमिका देणे कठीण आहे. काळाची पावले ओळखणे गरजेचे आहे.