आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्य, ज्याचा पडतो समजदार लोकांनाही विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही समजूतदार लोकांनाही पुढे जाणे आव्हानात्मक आणि कठीण भासते. याचे मुख्य कारण म्हणजे ते पुढे मार्गक्रमण करताना खाली दिलेले दहा सत्य विसरून जातात. ते लक्षात ठेवल्यास आपल्या क्षमतांचा विकास होतो.

- जे काम करायला तुम्हाला आवडत नाही. ते काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कराल.
- भावनिक होऊन घेतलेले निर्णय ब-याचदा फायद्याचे ठरतात.
- पुढे जाण्यासाठी यशस्वी निर्णय किंवा मिळालेले परिणाम मोजत बसू नका. किती अपयश मिळाले, ते पहा. प्रत्येक अपयशी पाऊल तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणारे असते.
- तुम्ही खूप हुशार असाल किंवा डॉक्टरेट असाल. पुढे जाण्यासाठी काही पावले उचलत नसाल तर त्याचा काही फायदा नाही. तुम्ही कृती केली नाही तर हुशारीचा किंवा शिक्षणाचा काहीच उपयोग नाही.
- यश आणि समाधान या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आनंदी राहण्यासाठी यशस्वी होणे आवश्यक नाही. याउलट यशस्वी होण्यासाठी आनंदी राहणे आवश्यक आहे.
- तुम्ही कशा प्रकारे आयुष्य जगत आहात किंवा कोणासाठी काम करत आहात, यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त तुमच्यासाठी काम करत असता, हे सत्य आहे.
- निर्णय घेण्यासाठी आपण काही पर्याय निवडत असतो. जास्त पर्याय उपलब्ध असल्यास निर्णय घेणे कठीण जाते. त्यामुळे आपली आवड-निवड मर्यादित ठेवा.
- नवी संधी मिळाल्यास आपण त्यासाठी पूर्णपणे सज्ज नसतो. त्यामुळे चांगल्या संधी हातातून निसटून जातात.