आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On US Saudi Arebia By Michal Crowny, Divya Marathi

अमेरिका-सौदी अरेबिया दरम्यान संबंधात कटुता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांची सौदी अरबच्या शाहशी पहिली भेट एप्रिल 2009 मध्ये लंडन संमेलनात झाली होती. स्वदेशात त्यांच्या कडव्या टीकाकारांना वाटले की, वयोवृद्ध राजाशी हस्तांदोलन करताना ओबामा थोडेसे झुकले होते. वॉशिंग्टन टाइम्सने रागात प्रतिक्रिया दिली की, ओबामांचे हावभाव एका परेदेशीच्या प्रति स्वामीभक्ती दाखवत होते. तसे व्हाइट हाउसने त्याचा
इन्कार केला. व्हीडिओवरदेखील स्पष्ट पुरावे नव्हते. परंतु ओबामा हे पहिले अध्यक्ष नव्हते ज्यांनी अब्दुल्ला अस्सउदसोबत याप्रमाणे पाहण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी जॉर्ज बुश यांना त्यांच्या टेक्सासस्थित फार्ममध्ये अब्दुल्लांशी हातात हात घेऊन पायी फिरताना पाहणात आले होते.
यावेळी मध्य-पूर्वेत अमेरिकेची भूमिका आणि 70 वर्षे जुन्या युतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडेच इराण, सिरिया आणि इजिप्तप्रति अमेरिकेच्या भूमिकेने अमेरिका संबंधाची मुळेदेखील हलवून टाकली आहेत. तेहराणच्या दिशेने अमेरिकेच्या कूटनीती आघाडीने रियादला काळजीत टाकले आहे. शियाबहुल इराण आणि सुन्नी सौदी अरब कट्टर शत्रू आहेत.

गेल्या वर्षी ओबामांनी सिरियावर हल्ला न करण्याची दिलेली अनुकूल प्रतिक्रिया झालेली नाही. इजिप्तमध्ये सत्ता बळकावणा-या लष्करी प्रशासकांची ओबामांनी केलेले टीकादेखील सौदी नेत्यांना आवडलेली नाही. अशा परिस्थितीत सौदी अरबला वाटते की, त्यांना वॉशिंग्टनकडून सुरक्षिततेचे आश्वासन मिळू शकते का?
असुरक्षिततेची भावना सौदी अरबमध्ये जास्त आहे. तरीही अमेरिका शांतपणे बसू शकत नाही. पूर्व युरोपात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे इरादे आणि मध्य-पूर्वेतील देश आजही ओबामांचे परराष्ट्र धोरण केंद्रस्थानी ठेवतात. ओबामांच्या प्राथमिकतेत इराणकडून अणुऊर्जा करार आणि इस्रायल-अरब शांती प्रक्रिया यांचा समावेश आहे. सिरियाचे गृहयुद्ध त्यांच्यासाठी काळजीचा विषय आहे. यातून अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर परिणाम होत आहे. या स्थितीत अमेरिका-सौदी संबंध चांगले हवेत.

संबंधांचे गणित
सौदी अरबने 2011 मध्ये अमेरिकेकडून एफ-15 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 1744 अब्ज रुपयांचा करार केला.
2013 मध्ये अमेरिकेने सौदी अरब व अमिरातीला 661 अब्ज रु पयांचे क्रूझ क्षेपणास्र दिले.
अमेरिकेच्या तेल आयातीचा दोन तृतीयांश भाग सौदी अरबमधून मागवला जातो.