आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौल्यवान खनिजांसाठी चढाओढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉल ऑफ ड्यूटी ब्लॅक ऑपरेशन्स-2 नावाच्या व्हिडिओ गेममध्ये 2025 वर्षातील दुर्मिळ धातूंच्या वितरणावर नियंत्रणासाठी अमेरिका आणि चीनदरम्यान युद्धाची कल्पना करण्यात आली आहे. गेमच्या सुरुवातीला एक पात्र स्मार्ट फोनवर दुर्मिळ खनिजांच्या महत्त्वावर लांबलचक भाषण देते. ते विचारते, यावर कुणाचा ताबा आहे? नंतर स्वत:च उत्तर देते.. चीनचा.

अधिक कालावधी ओसरत नाही तोच व्हिडिओ गेमची वास्तविकता बदलण्याची स्थिती बनत आहे. दुर्मिळ खनिज तत्त्वांचा सर्वात मोठा उत्पादक चीनने 2010 मध्ये यांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्याची घोषणा करत जगभरात भीती पसरवली होती. दुर्मिळ खनिज एक खर्व डॉलरच्या अत्याधुनिक उत्पादन उद्योगांचा पायाभूत कच्चा माल आहे. यानंतर कॉम्प्युटर स्क्रीन, लाइट बल्ब तयार करणा-या कंपन्यांचे धाबे दणाणले होते. अमेरिका शस्त्रास्र निर्माते चिंतेने व्याकुळ झाले की, अब्राम्स रणगाडे, टॉमहॉक क्षेपणास्रांचे उत्पादन संकटात सापडेल.

परंतु असे झाले नाही. दुर्मिळ खनिज (रेअर अर्थ) जमिनीवर कोसळले. चीनने निर्यात थांबवल्यावरही कमतरता जाणवली नाही. जगात आर्थिक मंदीमुळे मागील वर्षात किमतींमध्ये नाटकीय घसरण झाली आहे. यादरम्यान अमेरिकी आणि जपानी कंपन्यांनी दुर्मिळ खनिजांच्या उपयोगात कपात करण्यासाठी मार्ग शोधले आहेत.

संगणक आणि कारचा प्राण
दुर्मिळ खनिज वास्तवात दुर्मिळ नाहीत. ते पृथ्वीवर पुरेशा प्रमाणावर उपलब्ध आहेत. परंतु, त्यांना खडकातून काढण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. जगभरात याची वार्षिक उलाढाल जवळपास दोन अब्ज डॉलर आहे. अमेरिकेत तर इतक्या प्रमाणावर च्युंगम विकले जाते. परंतु, उपयोगाचा विचार करता खनिजाची तुलना नाही. काही रुपयांच्या नियोडायमियनशिवाय कॉम्प्युटरची हार्डडिस्क चालणार नाही. डिस्प्रोमियमशिवाय कार पुढे सरकणारच नाही. खरेतर रेअर अर्थला (दुर्मिळ मृतिका) रिफाइन (परिष्करण) करण्याची प्रक्रिया किचकट आणि पर्यावरणासाठी नुकसानकारक आहे. 1960 ते 1980 पर्यंत माउंटेन पास, कॅलिफोर्नियातील एकमात्र खाण जगातील दुर्लभ खनिज तत्त्वांची मुख्य वितरक होती. किंमत स्थिर राहिल्याने आणि पर्यावरण नियमांमुळे, खर्च वाढल्याने अमेरिकेत उत्पादन घसरले. 1980 मध्ये चीनने या क्षेत्रात प्रवेश केला. 2002 मध्ये अमेरिकी खाणीला टाळे लागले. चीन आता जागतिक वितरणापैकी 95 टक्के उत्पादन करतो.

नाट्यमय तेजी
दुसरीकडे नफा कमी होणे आणि पर्यावरणाशी निगडित धोक्याला लक्षात घेत चीनने 2006 पासून उत्पादनात कपात करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये बिजींगने निर्यात 40 टक्के कमी केली. चीनने नाट्यमय रितीने दोन महिन्यांपर्यंत जपानला दुर्मिळ खनिजांचा पुरवठा थांबवला होता. चीनच्या पूर्वेकडील सागरात एका बेटाच्या मालकीवरून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादाशी या चीनने उचललेल्या पावलांशी जोडले गेले. चीनच्या दुर्मिळ खनिजांचा सर्वात मोठा ग्राहक जपान आहे. या दरम्यान धातू बाजारात वादळ निर्माण झाले. दुर्मिळ खनिजांच्या दरात 300 ते 1000 टक्क्यांची वाढ झाली.

पर्यायी मार्गाचा शोध
चीनची भूमिका लक्षात घेत अमेरिका, जपानने मौल्यवान खनिजांना शोधण्यासाठीच्या पर्यायी मार्गाच्या प्रयत्नांना गती दिली आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सरसावत आहेत. कोलेरेडो येथील मोली कार्पने माउंटेन पास येथील बंद करण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करण्यासाठी 50 कोटी डॉलर लावले आहेत.

अमेरिकेच्या तुलनेत जपानची अर्थव्यवस्था चिनी रेअर अर्थवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जपान मोठ्या प्रमाणावर विशिष्ट चुंबक आणि सुटे भाग बनवतो, ज्यात दुर्मिळ खनिजांचा वापर केला जातो. आपल्या अत्याधुनिक उत्पादन उद्योगांना धोका निर्माण झाल्याने चिंतीत जपानने चीन व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरील खनिजांची उगमस्थाने, पर्यायी साहित्य विकसित करणे आणि पुनश्चक्रण (रिसायकलिंग) साठी जपानी कंपन्यांना एक अब्ज डॉलरची सवलत दिली आहे. या प्रयत्नांचे परिणाम समोर येत आहेत. भारत आणि कजाकस्तानात दुर्मिळ खनिजांची उत्पादनस्थळे शोधण्यात आली आहेत. सुमितोमो, टोयोटासह जपानी कंपन्या लवकरच देशातील रेअर अर्थच्या गरजेला 35 टक्के पूर्ण करायला लागतील. या खनिजांच्या दुस-या पर्यायांचा वापर सुरू झाला आहे. सिरीयम खनिजाचा सर्वाधिक वापर पॉलिश करण्यासाठी केला जातो.

या ऐवजी एल्यूमिनाच्या वापरामुळे मागणीत 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. वाहन उत्पादक निसानने विजेच्या मोटारींसाठी नवीन चुंबक तयार केले आहे. यात डिस्प्रोसियमचा 40 टक्के कमी वापर होतो. रिसायकलिंगच्या प्रयत्नांनाही गती देण्यात आली आहे. चुंबक तयार करणारी कंपनी शिन इत्सू केमिकल व्हिएतनाममध्ये एक प्रकल्प उभारत आहे, ज्या माध्यमातून निष्क्रिय हायब्रिड वाहने व कॉम्प्युटरच्या हार्डड्राइव्हमधून दुर्मिळ खनिजे काढता येतील. हिताचीने हार्ड ड्राइव्ह, कंप्रेसर आणि एअर कंडिश्नरमधून खनिज वेगाने काढण्याचे उपकरण बनवले आहे. जगभरात दुर्मिळ खनिजांची बाजारपेठ छोटी आहे. यामुळे सांगणे कठीण आहे की, चीनचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी जपानकडून इतर देश धडा घेतील का?