आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vinod Hygriv And Ganesh Narayan, Divya Marathi

काका-पुतण्यांतील मतभेदामुळे 143 वर्ष जुन्या कंपनीत फूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद हयग्रीव - Divya Marathi
विनोद हयग्रीव

चर्चेचे कारण : बंगळुरूमध्ये 1869 मध्ये स्थापन झालेल्या सी. कृष्णय्या चेट्टी अँड सन्स कंपनीची कुटुंबीयांत वाटणी
जगातील उत्कृष्ट दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेली बंगळुरूतील सी. कृष्णय्या चेट्टी अँड सन्स अर्थात सीकेसी ही कंपनी 1869 मध्ये स्थापन झाली होती. कंपनीचे एमडी सी. विनोद हयग्रीव सांगतात, ‘महात्मा गांधीदेखील त्याच वर्षी जन्मले होते, हा एक सुखद योगायोग. तेव्हा ब्रिटिशांचे सरकार होते. कोथा कृष्णय्या चेट्टी यांनी कंपनी स्थापन केली होती. अधिका-यांना ते मोत्यांच्या माळा आणि इतर दागिने सायकलवरून विकत असत. कोथा कृष्णय्या अणि त्यांचे पुत्र कोथा आदिनारायण चेट्टी यांनी त्या काळी खूप प्रसिद्धी मिळवली होती. युरोपात त्यांचे दागिने प्रसिद्ध होते. त्यानंतर पिता-पुत्रांनी ब्रिटिश लष्कराने ट्रॉफी, मेडल आणि शिल्ड्स तयार केले. तसेच भारतातील म्हैसूर महाराज, हैदराबादचे निझाम, त्रावणकोर राजघराण्यातही आपल्या वस्तू आणि दागिने विकले. म्हैसूरचे महाराज श्रीकृष्णराजेंद्र वाडियार यांनी तर सीकेसीला अधिकृत ज्वेलर म्हणून नियुक्त केले होते. आजही 20 शाही घराणी या कंपनीचे ग्राहक आहेत. डी बीयर्स या जगातील प्रमुख हिरा कंपनीने भारतात सर्वप्रथम सीकेसीसोबतच ‘फॉर एव्हरमार्क’ ही डायमंड रेंज सुरू केली होती. स्वित्झर्लंडच्या रोलेक्सने याच फर्मला वितरक बनवले होते. 1970 च्या दशकात कंपनीने शॉपचे पुनर्निर्माण केले तेव्हा ते खूप वेगळे आणि दक्षिण भारतातील पहिले एअर कंडिशंड शोरूम होते.


बिशप कॉटन बॉयज हायस्कूलनंतर क्राइस्ट कॉलेज, सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकलेले विनोद हायग्रीव यांनी 1980 च्या दशकात कंपनीसाठी कामाला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांपूर्वी विनोद हायग्रीव आणि पुतणे गणेश नारायण यांनी वेगळ्या वाटा निवडण्याचे ठरवले. गणेश डीकिन विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठात शिकले आहेत. बिशप कॉटन बॉयज स्कूलमध्ये शिकल्यानंतर ते अमेरिकेत गेले. 1997 मध्ये कंपनीत कार्यरत झाले. विनोद हायग्रिव हे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. गणेश यांच्या पत्नीने कुटुंबाच्या परवानगीशिवाय ऑनलाइन ज्वेलरी व्हेंचर सुरू केल्याचे सांगितले जाते. असे असले तरी ही वाटणी म्हणजे कंपनीचे रिस्ट्रक्चरिंग असल्याचे काकांचे म्हणणे आहे. मात्र, 6 पिढ्यांपासून एका छत्राखाली असलेल्या या कंपनीची आता वाटणी होत आहे.