आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात तयार होणारी निवडणुकीची शाई 28 देशांत निर्यात होते. 2012 मध्ये या शाईच्या निर्यातीतून शाई उत्पादक कंपनीने चार कोटी रुपये कमावले.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोटावरील शाई पुसून दोन वेळा मतदान करण्याचा अजब सल्ला दिला होता, पण असे करता येणे शक्य नाही, असा शाई उत्पादक कंपनीचा दावा आहे.
कोण आहेत शाईचे उत्पादक ?
देशात निवडणुकीची शाई फक्त म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) कंपनी तयार करते. कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील ही कंपनी 1962 पासून निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार शाई तयार करते. निवडणुकीच्या शाईची खुल्या बाजारात विक्री होत नाही.
कशी तयार होते?
इनडेलिबल इंकमध्ये स्प्रिंट आणि सिल्व्हर नायट्रेट मिसळले जाते. जांभळ्या रंगाची फोटो सेन्सेटिव्ह स्वरूपाची ही शाई आहे. जी प्रकाशाच्या संपर्कात येताच गडद होते. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत याचे उत्पादन केले जाते.
14,000 रुपये प्रतिलिटर
व्हॅट आणि एक्साइज ड्यूटीशिवाय 10 मिलीच्या बाटलीची किंमत 141 रुपये एवढी आहे. म्हणजे एक लिटर शाईसाठी 14 हजार रुपये मोजावे लागतात. 10 एमएल शाईने 500 लोकांच्या बोटांवर खूण करता येते.
31 कोटी रुपयांची शाई
या निवडणुकीसाठी 10 एमएलच्या 22 लाख बाटल्यांचा वापर होईल, असा अंदाज आहे. ज्याची किंमत 31 कोटी रुपये असेल.
3000 शाईच्या बाटल्या एका आठवड्याच्या आत म्हैसूर पेंट्सने पूर्वी तिमोर या देशाला 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी पाठवल्या होत्या. कमी वेळेत कंपनीने डिलिव्हरी केलेली ही सर्वात मोठी ऑर्डर होती.
1961 च्या निवडणूक कायद्यानुसार मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावरील नखावर ही शाई लावली पाहिजे. बोटावर शाईची खूण पहिल्यापासून असल्यास व्यक्ती मतदान करू शकत नाही.
1979 पासून कंपनीने शाईचे पॅकिंग काचेऐवजी प्लास्टिकच्या बाटलीत करायला सुरुवात केली. तुटल्या, फुटल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी. नुकसानीचे प्रमाण 15 टक्क्यांवरून एक टक्क्यांवर आले.
या निवडणुकीत 35 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएमचा वापर केला जाईल. एका ईव्हीएममध्ये एका मिनिटात पाच मतदानांची नोंद होऊ शकते.
पुढे वाचा मतदान यंत्राविषयी.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.