आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याहूला अपलोड करण्याचे मायर यांचे धोरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरिसा मायर यांनी दीड वर्षापूर्वी याहूच्या सीईओची धुरा सांभाळली, तेव्हा त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. त्यांना उतारवयातील तंत्रज्ञान ‘टायटन’च्या रक्षकाच्या रूपात पाहिले गेले. असो. मात्र आता मधुचंद्र उरकला आहे. याहूच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. मायर यांनी गेल्या महिन्यात दुस-या क्रमांकाचे एक्झिक्युटिव्ह हेनरिक डीकेस्ट्रो यांना नारळ दिले.
तरीदेखील परिस्थिती बदलण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. ढीगभर आव्हाने समोर असताना याहू इंटरनेट तंत्रज्ञानातील आघाडीची शक्ती आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे ऐशी कोटी लोक त्याच्या विविध ऑनलाइन सेवा मीडिया, ई-मेल, सर्च आदींचा उपयोग करतात. चीनची ई-कॉमर्स फर्म अलीबाबामध्ये त्याची 24 टक्के भागीदारी आहे.
अलीकडे टम्बलर, न्यूज समरी अ‍ॅप समली आणि मोबाइल व्हीडिओ अ‍ॅप क्विकीचे अधिग्रहण मायर यांना याहू ब्रॅँड सुधारण्यात सहायक ठरेल. वरिष्ठ विश्लेषक सुसान बिडेल सांगतात, मला वाटते की, मायर यांना आव्हाने झेलायला आवडते. इंडस्ट्रीशी संबंधित कित्येक तज्ज्ञांना वाटते, काहीही पर्याय शोधून याहू यश प्राप्त करू शकते.
यशाचा मार्ग
* बातम्यांवर जोर
याहूने प्रसिद्ध पत्रकार केटी कौरिक आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या डेव्हिड पोगयेची सेवा घेतल्या आहेत. टेक आणि मीडिया विश्लेषक रॉस रुबिन सांगतात, काही परिचित लोकांना सोबत घेऊन त्या न्यूज मीडियामध्ये प्रमुख खेळाडू बनू शकतात.
* व्हिडिओ नेटवर्क
याहू फूड, याहू फायनान्स यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर व्हीडिओ कन्टेंट टाकण्याने ते स्मार्ट टीव्हीदेखील पाहिले जाऊ शकते. त्यातून चार अब्ज डॉलरची ऑनलाइन व्हिडिओ इंडस्ट्रीत त्याची भागीदारी वाढू शकते.
* सर्चला नवे रूप
टेक विश्लेषक कॉलिन गिलीस म्हणतात, 2009 मध्ये मायक्रोसॉफ्टशी भागीदारीनंतर सर्चच्या क्षेत्रात याहूची पकड सैल झाली आहे. ते आपल्या बळावर वीस अब्ज डॉलरच्या सर्च जाहिरात बाजारात चांगली जागा मिळवू शकतात.