आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचा अनुभव देणारी हुबेहूब लघुचित्र कलाकृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावरून चालताना आपले लक्ष समोरील बाजूस असते. आजूबाजूला काय दिसते, याकडे फार लक्ष नसते. स्वीडनमधील बर्ग्सगेटन परिसरातील एक लघुचित्र कलाकृती रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलवत आहे.

} या लघुचित्र कलाकृतीत एक रेस्टॉरंट, सायकल, चहाचा टेबल, पुष्पगुच्छ, नाइट लॅम्प आदी वस्तू दिसतात. वरील छायाचित्रात रस्ता आणि सायकल दिसत नसती तर तो खराखुरा रस्ता असल्यासारखे वाटले असते.
} रेस्टॉरंटवर ‘नट्स ऑफ लाइफ’ असे नाव लिहिलेले असून त्यात खरोखरच ग्राहक बसले असल्याचा भास होतो. बाहेर एका चित्रपटाचे पोस्टरही लावण्यात आले आहे. बाजूलाच आणखी एक रेस्टॉरंट दिसत असून त्यावर ‘तोपोलिनो’ असे मिकी माऊसचे इटालियन नाव लिहिलेले आहे.
} स्वेन्सकान या स्वीडिश वेबसाइटच्या मते, इन्स्टाग्रामवरील ‘अनॉनिमस- एमएमएक्स’नावाच्या कलाकाराने या कलाकृतीचे छायाचित्र टाकले आहे. २०१७ हे वर्ष अशाच नव्या कलाकृतींनी ओळखले जाईल, असे त्याने म्हटले आहे. }sydsvenskan.se
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...