आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Bhardwaj Run Kanyakumar To Kargil Within 60 Days

महत्त्वाकांक्षा: कन्याकुमारी ते कारगिल ६० दिवसांत धावले अरुण भारद्वाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
*अरुण भारद्वाज : नीती आयोगात कर्मचारी
*जन्म : २४ फेब्रुवारी १९६९, बाओली गाव, बागपत जिल्हा, उत्तर प्रदेश
*शिक्षण : बीकॉम, दिल्ली विद्यापीठ
*कुटुंब : संगीता भारद्वाज (शिक्षिका), १६ वर्षांची मुलगी जोला, १४ वर्षांचा मुलगा सेफिया आणि १२ वर्षांचा मुलगा यानिस अर्जुन
चर्चेत : जोहान्सबर्गमधील धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिस-या क्रमांकावर. पुढील लक्ष्य २४ तासांत २७५ किमी धावणे.

अरुण यांनी २००० मध्ये २३ तासांत १८० कि.मी. अंतर कापून अल्ट्रा रनची सुरुवात केली होती.त्यांनी अनेक राष्ट्रीय व जागतिक विक्रम नोंदवले आहेत.ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ८५४५ किमी अंतर कापले.कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीच्या अल्ट्रा मॅराथॉनमध्ये भाग घेणारे ते एकमेव भारतीय आहेत. मॉस्कोतील पाऊस आणि उणे ४ अंश तापमानातही ते धावले आहेत. एका वर्षात तीन स्पर्धा पूर्ण करणारे ते आशियातील एकमेव धावपटू आहेत. त्यांनी आतापर्यंत १७ अल्ट्रा मॅराथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. यात ६० दिवसांत कारगिल ते कन्याकुमारी या आवडीच्या मोहिमेचा समावेश आहे. बर्फ व उणे शून्याहून कमी तापमानात देशातील अनेक उंच शिखरे सर केली आहेत. १७ हजार फूट उंचीवरील तागलंग-ला, १६ हजारांवरील लाचुंग-ला आणि १३ हजारांवरील रोहतांग-ला मोहिमा त्यांनी गाजवल्या आहेत. इथे अपुरा ऑक्सिजन असला तरी दरदिवशी ५० किमीची चढाई ठरलेली असायची. धावण्याच्या नित्यक्रमामुळे ते आठवड्याला २०० किमी अवश्य धावतात. त्यामुळे दर महिन्याला नवीन बूट खरेदी करावे लागतात. नाही धावलो तर आजारी पडेन, असे त्यांना वाटते. ६ ते १९ वयादरम्यान दरवर्षी त्यांना मलेरिया झाला. ट्यूमरच्या चार मोठ्या शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. कृश शरीरामुळे तेव्हा त्यांचे वजन ३५ किलो होते. मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी तिसाव्या वर्षी पहिल्यांदा धावलो. ज्या दिवशी धावत नसेन तेव्हा मुलांना याचे प्रशिक्षण देत असल्याचे अरुण यांनी सांगितले. पत्नी संगीता म्हणाल्या, त्यांनी ४००० किमी धावण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा खूप भीती वाटली होती.त्यांनी आज माझे ऐकले नाही, याचा आनंद वाटतो. नवीन भागातील प्रवास आणि लोकांना भेटल्यामुळे त्यांना अल्ट्रा रेससाठी प्रोत्साहन मिळते. या सर्वात देशातील आपण एकमेव अल्ट्रा मॅराथॉन रनर असल्याचा अभिमानही वाटतो, असे त्यांनी सांगितले.
१५ वर्षांपासून अरुण यांचा दिनक्रम
*केवळ चार तास झोपतात
*रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत
*आठवड्यात एक रात्र झोपेविना घालवतात.
*शुद्ध शाकाहारी आहेत.
*१२ लिटर पाणी दररोज पितात.
*मध, ज्यूस, केळी आणि उसाला हेल्थ सिक्रेट मानतात.
(शब्दांकन : उपमिता वाजपेयी)