आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बड्या टिश्यू पेपर मेकरचा बंगला, मुंबईतील मोठी डील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण जटिया, जटिया हाऊसचे मालक
वय- सुमारे ५३ वर्षे
वडील- महावीर प्रसाद
शिक्षण- फायनान्शियल अँड बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधून बीएस
कुटुंब- पत्नी, मुलगा,दोन मुली
चर्चेत - त्यांच्या बंगल्यासाठी कुमारमंगलम बिर्ला यांनी ४२५ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

जटिया हे मूळचे राजस्थानी कुटुंब. मात्र, अरुण यांचे वडील महावीरप्रसाद व्यवसायाच्या उद्देशाने म्यानमारला जाऊन स्थायिक झाले. १९६४ मध्ये तेथील सत्ताबदलानंतर ते मुंबईत परतले. १९७१ मध्ये त्यांनी जटिया हाऊस विकत घेतले. तेव्हा अरुण यांचे वय अवघे ८ वर्षे होते.

अरुण सांगतात की, हा बंगला वडिलांसाठी खूपच लकी ठरला. याच बंगल्यातून त्यांनी पद्मजी पल्प नावाने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सध्या याचा पुण्यात कारखाना असून देशातील सर्वात मोठे टिश्यू पेपर मेकर म्हणून पद्मजी यांचे नाव घेतले जाते. अरुण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाचही भावांचे लग्न याच बंगल्यात झाले. त्यांचे बंधू श्याम मात्र सध्या त्यांच्यासोबत राहत नाहीत. मलबार हिल या आलिशान वस्तीत हा बंगला ३० हजार चौरस फूट जमिनीवर विराजमान आहे. १९२८ मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला अरुण यांच्या वडिलांनी मेहर कावसजी वकील यांच्याकडून विकत घेतला. बंगल्याच्या देखभालीसाठी ३५ कर्मचारी ठेवले आहेत. यात बर्मा टीक लाकडांनी कलाकुसरीचे काम करण्यात आले आहे.

या बंगल्याला लागूनच मेहरानगीर बंगला असून तो भाभा हाऊस नावाने ओळखला जातो. मागच्या वर्षी त्याची ३७२ कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. भाभा हाऊसपेक्षा जटिया हाऊस दुप्पट मोठा आहे. कुमारमंगलम बिर्ला यांनी यासाठी ४२५ कोटींची लावलेली बोली मुंबईतील आतापर्यंतची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील मानली जाते. यापूर्वी जिंदाल समूहाच्या सज्जन जिंदाल यांनी ४०० कोटी रुपयांत माहेश्वरी हाऊस विकत घेतले होते. अरुण जटिया १९८० मध्ये अमेरिकेत शिक्षणासाठी आणि नंतर व्यवसायासाठी सिंगापूरला गेले.