आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅशनच्या बाजारात एसीना ग्रुपचा दबदबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांचे कपडे बनवणारी अमेरिकी कंपनी एसीना रिटेल ग्रुपने एन टेलर आणि लॉफ्ट कंपन्या २.१६ अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्याची घोषणा केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड जाफे आपला खजिना लोकप्रिय फॅशन ब्रँडमध्ये समाविष्ट करत आहेत. त्यांच्याजवळ ड्रेसबार्न आणि लेन ब्रायंटसारखे ब्रँड पहिल्यापासून आहेत.

जाफेचा प्रवास
जाफेच्या आई-वडिलांनी १९६२ मध्ये मुख्य ब्रँड ड्रेसबार्नसोबत एसीनाला सुरुवात केली. जाफेने परिवाराच्या व्यवसायात सहभागी होण्यापूर्वी कुठल्याही कंपनीत दहा वर्षांचा अनुभव घ्यावा असे त्यांच्या वडिलांचे मत होते. जाफेने रिटेल कंपन्या ऑफिस डेपो आणि पेटकोमध्ये गुंतवणुकीद्वारे सुरुवात केली होती.

सध्याची आव्हाने
कॅज्युअल क्लोदिंगचे चलन वाढले आहे. ग्राहक महागडे कपडे खरेदी करत नाहीत. गेल्या वर्षी कोल्ड वाॅटर क्रीक, जे जिल आणि जेसी पॅनी कंपन्यांना कठीण परिस्थितीतून जावे लागले. जाफेला सिद्ध करावे लागेल की त्यांचा ब्रँड ट्रेंड बदलू शकेल.
एसीनाचे चमकते तारे
ड्रेसबार्न
विक्री - 63 अब्ज रुपये, स्टोअर- 820, वैशिष्ट्य- वाजवी दरात वस्त्र

एन टेलर
विक्री -6044 कोटी रुपये, स्टोअर - 361, वैशिष्ट्य- प्रोफेशनल पोशाख

लेन ब्रायंट
विक्री -69 अब्ज रुपये, स्टोअर - 771, वैशिष्ट्य- प्लस साइजचे वस्त्र

लॉफ्ट
विक्री - 101 अब्ज रुपये, स्टोअर - 669,

वैशिष्ट्य- वाजवी दरात प्रोफेशनल, कॅज्युअल वस्त्र
बातम्या आणखी आहेत...