आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
धर्मात फूट पाडणे साहित्याचे काम होऊ शकत नाही. हे काम तर इंग्रजांचे होते. हुबळीच्या घाणेरड्या किनारी गलितगात्र कासवे कापून जशी तराजूत तोलली जातात तशीच स्थिती इंग्रजांनी आपली केली आहे. आपल्या व्यवस्थेतील संस्कृती, देवी-देवता व जातीपातीवर त्यांनी सतत हल्ले चढवले, परंतु इंग्रज गेल्यानंतरही त्यात का फरक पडला नाही? याचे उत्तर गांधीजींच्या एका उत्तरातून मिळू शकेल. 14 ऑगस्टच्या रात्री देश स्वातंत्र्यप्राप्तीने उजळून निघाला होता, त्यावेळी महात्मा गांधी दंगलग्रस्त भागात रडत होते. त्यावेळी बीबीसी वार्ताहराने त्यांना विचारले, व्हाय आर यू क्राइंग मि. गांधी? त्यावर ते म्हणाले, गांधींना इंग्रजी समजते, हे तुम्ही आता विसरा. गांधीजींच्या या उत्तराचा अर्थ आपल्याला अद्याप कळला नाही. याचाच अर्थ इंग्रजांनी धर्म, देवी-देवता व संस्कृतीमध्ये फाटाफूट करण्याचे काम केले ते आपण करू नये ही अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही हे कळून चुकते.
भारतात अजूनही इंग्रजांच्या मानसिकतेचे लोक आहेत. त्यांना फारतर इंग्रजांचे नंदी म्हणता येईल. ज्यांच्या वागण्या बोलण्यातून धर्मात फूट पाडण्याचा वास येतो. तुम्ही साहित्य संमलेनात आला आहात, साहित्यावर बोला. जातीला भ्रष्टाचार चिकटवून तुम्ही किती इमानदार होता? साहित्यात जात, धर्म असत नाही. विविध राज्य, देशांच्या लोकांचे मनोमिलन येथे होते. इथे नद्यांच्या पाण्याला एका परिभाषेत संबोधले गेले. एकदा भारतीय साहित्यिकांचे शिष्टमंडळ उज्बेकला गेले होते. ज्यावेळी दोन्ही देशांचे लेखक-कवी एका मंचवर आले तेव्हा नद्याही एकमेकीत मिसळून गेल्या. त्यांच्या नदीचे नाव वजरआब व आपल्या नदीचे चिनाब. यातूनच पुढील रचना आकारास आली.
चिरा विछुन्नी कलम जिस तरह
घुट के कागद दे गल लग्गी
भेद इश्क दा खुलदा जावे ।।
इक्क सतर, पंजाबी के विच
इक्क सतर उज्बेक सुणी वे
फेर काफिया मिलदा जावे ।।
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.