आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिक्सर-म्युझिक सिस्टिमपासून रोबोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोबोटिक संशोधनात अग्रगण्य असलेले आनंद 15 वर्षांचे असतानाच त्यांना स्वयंपाकघरातील आईचे मिक्सर किंवा ग्राइंडर सारखे खराब का होते, याचे नेमके उत्तर माहीत होते. लहान भावाची म्युझिक सिस्टिमही वारंवार नादुरुस्त का होते, यामागील तंत्रज्ञानविषयक कारणही माहीत होते. काही मिनिटांतच ते अशी उपकरणे नीट करत असत. आयुष्यातील पहिला रोबोटही त्यांनी याच मिक्सर, ग्राइंडर व म्युझिक सिस्टिममधील भाग एकमेकांना जोडून तयार केला होता. त्यांचा हा दोन फुटांचा रोबोट चहुबाजूंनी फिरू शकत होता. लहान वस्तू एका जागेवरून दुसर्‍या जागी नेऊन ठेवू शकत होता. या रोबोटसाठी शाळेतील विज्ञान प्रदर्शनात त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

आयसेक एसिमोव्ह यांच्या कथा वाचत ते मोठे झाले. वयाच्या 8 वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईचे प्रोत्साहन व कष्टाच्या जोरावर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. तेथे कारखान्यात काम करणार्‍या कारागिरांना विजेचा करंट बसू नये यासाठी मनगटावर बांधण्याचे उपकरण तयार केले. त्वचेत वीजप्रवाह उतरताच 10 मिलि सेकंदात हे उपकरण वीज पुरवठा बंद करते. त्यांचे हे उपकरण राष्ट्रीय पॉवर सिस्टिम परिषदेत सादर करण्यात आले होते. त्यांच्या या संशोधनाच्या कीर्तीने अमेरिकेतील स्टेनफोर्ड विद्यापीठातून निमंत्रण मिळाले. तेथे त्यांनी 2006 मद्ये मास्टर्स व 2009 मध्ये कंप्यूटर सायन्समध्ये पीएचडी केली. सध्या प्रत्येक घरात कंप्यूटर आहेत, त्याप्रमाणे आगामी 20 वर्षात प्रत्येक घरात रोबोट असावा, अशी त्यांची इच्छा आहे. कॉर्नोल विद्यापीठातील कधी काळी ओस पडलेस्या प्रयोगशाळेत सध्या 15 जणांची टीम काम करत असून त्यातील पाच पीएचडीच्या विद्यार्थी आहेत.

शिक्षण : कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी
कुटुंब : वडील बँक मॅनेजर व व्हेटर्नरी डॉ. आनंद प्रकाश यांचे निधन झाले असून आई कवयित्री.
- अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात सहायक प्रोफेसर आशुतोष सक्सेना यांनी मानवी आवाज ओळखून आदेशानुसार काम करणारा थ्रीडी कॅमेरायुक्त रोबोट विकसित केला आहे.
(फोटो - आशुतोष सक्सेना)