आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asmita Aggarwal Article About Fashion, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशातील वधूंचाही पारंपरिक भारतीय वस्त्रांकडेच ओढा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपन यांनी जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तेथेच त्यांना अनिवासी भारतीय वधूंना भेटण्याची संधी मिळाली. त्यापैकी काही वधूंनी डिझायनर सुनीत वर्मांकडून ड्रेसअप करून घेतले होते. पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनीषाचे लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक ठरले.

अमेरिकेत सुमारे 30 लाख श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत. त्यांच्याशी चर्चा करून सुमारे 10 लाख डॉलर्सचा व्यवसाय करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात डिझाइन्समधून कन्सल्टेशन, रनवे शोज आणि प्रदर्शन होतील. अमेरिकेतील अनेकांना वधूचे ड्रेस किंवा मागणीनुसार ड्रेस तयार करून मिळत नाहीत. यानुसार केवळ वधूसाठीच्या ड्रेसचे मार्केट 30 दशलक्ष डॉलरपर्यंत नेता येऊ शकते, असे सपना यांचे मत आहे.

अनिवासी भारतीय वधूंना शो-ऑफ करताना फार काही वाटत नाही. त्या मोकळ्या विचारांच्या असतात. त्यांना पाउडल ब्लू, लिलॅक आवडते. त्यामुळे स्पेगिटी किंवा नूडल स्ट्रॅप स्टाइलनेही अधिक चांगला लूक देता येईल. डिझायनर सुनीत वर्मांना किंग ऑफ एम्ब्रॉयडरी मानले जाते. त्यांनी तयार केलेल्या वधूच्या परिधानांची किंमत 60 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत आहे. डिझायनर्सच्या मते, अनिवासी भारतीय वधूंचे ड्रेसअप करणे खूप सोपे असते. सुनीत यांच्या मते, एनआरआय वधूचा मेकअप करताना, ते एक आव्हान समजून जागतिक दृष्टिकोन लक्षात घेणे आवश्यक असते. त्यांना उजळ रंग, सिक्वेन्स, स्वरोस्की वर्कचे फिशटेल गाऊन आवडतात.

सुनीत अमेरिकेत ग्रँड फिनाले शो करतील. जॉय मित्रांनी मागील वर्षी हा शो सादर केला होता. त्यांच्या मते, अनिवासी भारतीय वधूंना भारतीय लहेजा आणि आधुनिक लूक असे दोन्ही हवे असते. या महिलांना कॅपेचिनो, डस्टी ब्राऊन आणि रस्टी गोल्ड रंगासह पेस्टल कलर खूप आवडतात. महिलांना शरारा, पँट आणि मिड-काफ लेंथ पँटवर कुर्ता चांगला दिसतो. सपना सांगतात, स्पलेंडेड इंडियन क्लोसेटमध्ये भारतीय फॅशन डिझायनर्सना व्यासपीठ मिळते. त्यात एसआयसी फॅशन टूर ट्रंक शो आणि द ब्रायडल बाजार हे दोन अतिरिक्त शो असतील.

अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन क्षेत्रातील लेखनासाठी प्रसिद्ध , नवी दिल्ली


(डेमो पिक)