डिझायनर पायल जैनचे नाव तिच्या चिकनकारी असलेल्या डिझाइन्समुळे प्रसिद्ध आहे. पायलने चिकनकारीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. सध्या पायल स्वत:ची नवी वस्त्रशैली लाँच करण्याच्या तयारीत आहे. तिने
आपल्या नव्या श्रेणीला ‘इंडी ब्ल्यू’ असे नाव दिले आहे. २० वर्षांपासून फॅशन जगतात काम करत असल्याने माझा कल भारतीय टेक्सटाइल व क्राफ्टकडे असल्याचे तिने सांगितले. भारतातील वैभवशाली वस्त्र परंपरा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी याच परंपरेला स्वत:च्या कौशल्याने सादर केले आहे. त्यांच्या अनेक कलेक्शन्समध्ये याची झाक दिसून येते. तंत्र, कलाकुसर, पोशाखाची लकब यातून भारतीय परंपरा झळकते. तिला नैसर्गिक पोत, भारतीय पारंपरिक कलाकुसर, नैसर्गिक डाय व हातमाग प्रेरित करते. याची झलक तिच्या कलेक्शनमध्ये असते. क्राफ्टवर काम करणे तिला आवडते. भारताचा वैभवशाली वारसा नवीन रूपात सादर करण्याकडे कल असतो. आपले कलेक्शन ग्लोबल असते, असे ती म्हणते. भारतीय झाक असलेले हे कलेक्शन आपले वेगळेपण जपून आहे. या वस्त्रश्रेणीत को-वेस्टर्न बॉडी, इंडियन सोल ही टॅगलाइन असते.
माझ्या कलेक्शनसारखेच माझे व्यक्तित्व आहे, असे पायल सांगते. तिचे कलेक्शन तिच्या स्वत:च्या अभिरुचीचा एक भाग आहे. कोणत्याही डिझाइन प्रिंट, टेक्सटाइल, कलाकुसर किंवा इम्बेलिशमेंटला फॉलो करण्यापूर्वी त्यांची टीम पूर्ण रिसर्च करते. कोणतेही कलेक्शन प्लान केल्यानंतर त्याला तयार करण्यासाठी ६ ते १८ महिने लागतात. त्या श्रेणीत कोणते तंत्र वापरले आहे, यावर किती वेळ लागेल, हे निर्भर आहे. आपल्या देशात रंगांचा संबंध सणावारांशी जोडला गेला आहे. विशेषत: हिवाळ्यात. त्यामुळेच गडद व चमकदार रंगांचे जास्त महत्त्व आहे. हिवाळ्याच्या दिवसांत गडद रंग, ब्लड ऑरेज, फुशिया, इंडिगो, हिरवा रंग अधिक वापरले जातात. आधुनिक महिलांच्या पसंतीला ध्यानात घेतले तर त्या जास्त स्टायलिश व प्रयोगशील झाल्या आहेत. रंग, कपड्याचा पोत, डिझाइन, स्ट्रक्चर व अॅक्सेसरीजमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी त्या नेहमी उत्साही असतात. महिलांना डिझाइन्ससोबत प्रयोग करणे मौजेचे वाटते.
‘इंडी ब्लू’ कलेक्शनची प्रेरणा नदीपासून घेतली आहे. नदीच्या उगमापासून ते ती समुद्रात विलीन होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास या श्रेणीत दाखवण्यात आला आहे. या वस्त्रश्रेणीमध्ये विविध अनुभव, भावना, प्रकाश तसेच घटनाक्रमही प्रतिबिंबित करण्यात आला आहे. एक नदी तिच्या प्रवाहात येणार्या प्रत्येक अडथळ्यांना, तसेच चांगल्या-वाईट क्षणांना स्वत:त सामावून घेते. अविरत वाहत राहणे हा तिचा स्वभाव असतो. हे वस्त्रश्रेणीच्या रूपात सादर करण्याचा प्रयोग इंडी ब्ल्यूमध्ये करण्यात आला आहे. नदीच्या रूपकाला महिलेसाठी वापरण्यात आले आहे. महिलेच्या आयुष्यातील प्रसंग यातून सादर करण्यात आले आहेत. कलेक्शनची सुरुवात स्ट्रक्चर्ड शिफअट ड्रेसेस, जॅकेट, वेस्टकोट, गिलेट्स, जोधपूर जेगिंग्स, ट्रेंच कोटपासून करण्यात आली आहे. यानंतर फ्री-फ्लोइंग गाऊन, फुल-सर्क्युलर स्कर्ट, मल्टी-पॅनल्ड अंगरखा, ट्युनिकही सादर करण्यात येतील. आजच्या स्टाइलप्रेमी व स्वावलंबी महिलेला लक्षात घेऊन सिल्क, सॅटीन, अर्दी लिनन सिल्क, क्रिमी जॉर्जेट इत्यादींचा याचा समावेश आहे. दिल्लीच्या हॉटेल हयात रिजेंसीमध्ये हे सादर होणार आहे.
अस्मिता अग्रवाल
२२ वर्षे फॅशन लेखनातील प्रसिद्ध नाव, नवी दिल्ली.