आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक स्त्रीला वेगळा लूक देण्यासाठी विव्हजसोबत प्रयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशातील विदिशामध्ये जन्मलेल्या वैशाली षडांगुले आपल्या ‘वैशाली एस’ या फॅशन लेबलच्या माध्यमातून सुपरिचित आहेत. डिझायनिंगमध्ये कोणताही गॉडफादर नसतानादेखील त्यांनी या क्षेत्रात स्वतंत्र स्थान प्राप्त केले. त्या साडीची परंपरागत संकल्पना तसेच विव्हजसाठी (विणकाम) ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या विव्हजप्रेमाबद्दल या सदरात माहिती दिली...
वैशाली यांची फॅशन केवळ साडीला नवा लूक देण्यापर्यंत मर्यादित नाही. त्यांना विणकामात विशेष रुची आहे. आधुनिक स्त्राला क्रेप आणि शिफॉनपेक्षा वेगळे काही तरी देण्यासाठी त्यांनी विव्हजला फ्युजन वेअरमध्ये बदलले आणि नव्या पिढीतील महिलांसाठी खास कलेक्शन तयार केले आहे. साडी आवडणा-या, परंतु साडीत कम्फर्टेबल न वाटणा-या अनेक महिला त्यांना माहिती आहेत. त्यामुळे फॅशन लव्हर्ससाठी पारंपरिक मोटिफ आणि विव्हजवर त्यांनी काम केले. जगभरात विणकामासाठी आपल्या देशाला ओळखले जाते. येथील प्रत्येक शहराचा पॅटर्न, स्टाइल आणि डिझाइन एकमेकांपासून भिन्न आहे. त्यामुळे कोणत्याही एका डिझाइनरसाठी हे सर्व विणकाम समजणे आणि ती कला आत्मसात करणे तेवढे सोपे काम नाही. याशिवाय हे सर्व विणकाम हातमागावरील आहे. यातून विणकामाला सुपिरिअर लूक मिळतो. पाश्चात्त्य महिलांना हँडमेड आउटफिट जास्त आवडते. विणकामावर सखोल संशोधनाअंती त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्यांनी अशा चार विणकामांबाबत सांगितले ज्याचे त्यांनी ड्रेसेस, गाउन, ट्युनिक, ड्रेप्सचे विशेष कलेक्शन तयार केले आहे.
चंदेरी : याचे मूळ मध्य प्रदेश आहे. आपल्या आई, आजीला त्यांनी चंदेरी नेसलेले पाहिले होते. त्याचा पारदर्शक इफेक्ट आणि फ्लो सुरेख आहे. स्वत:चे लेबल लाँच केल्यानंतर त्यांनी चंदेरीपासून सुरुवात केली होती. यामध्ये सिल्क व सुती कपडा मिक्स असतो. त्यामुळे त्याचा दर्जा उंचावतो. त्यांनी याच्या वापरासाठी हेमलाइन्स बॉर्डरप्रमाणे प्लिट्समध्ये केले.
खंड : मूळ कर्नाटकातील हा पॅटर्न आहे. महाराष्‍ट्रामध्येही तो दिसतो. विणकर त्यास रेशीम आणि सुती कापडापासून तयार करतात. बनारसी सिल्कप्रमाणे ब्रोकेड हेव्ही असते. खंड हलकी, इझी टू ड्रेप फॅब्रिक मानली जाते. सुरुवातीस कपड्याची रुंदी कमी होती, त्यामुळे त्यापासून केवळ ब्लाऊज तयार केले जात होते. मात्र, आता याची साडी आणि गाऊनही होते.
जमदानी : हा मूळ बंगाली पॅटर्न असून तो हातमागावर केला जातो. सुफी विचारांतून प्रेरणा घेतलेली ख्वाजा लाइन याच्या कापडापासून तयार केली आहे. यामध्ये भौमितीक आकार, उदा : एकमेकांना छेदणारी वर्तुळे, चौकोन आदी असतात. या साड्यांना ग्राफिक फील असतो. या व्यतिरिक्त पैठणी आणि मेखला चादर कापडासोबत काही खास प्रयोग आणि कलेक्शन तयार केले आहे.