आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पल दागिन्यांची पुन्हा मोहिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजे- रजवाड्यांच्या काळातातील सुंदर नक्षीकाम केलेले, बहारदार पॅटर्न असलेले टेम्पल दागिने पुन्हा ज्वेलरी शॉपमध्ये दिसायला लागले आहेत. लग्नसमारंभात सर्वांना आकर्षित करणारे हे पारंपरिक लूकचे दागिने आहेत. आगामी लग्नसराईसाठी हा ऑप्शन जरूर विचारात घेण्यासारखा आहे.


दाक्षिणात्य देवळांतील नक्षीकामाची छबी या दागिन्यांमध्ये दिसते. दक्षिण भारतातील गोकार्क भागातील कारागीर या दागिन्यांची निर्मिती करतात. यात बिंदी, नथ, नेकलेस, कानातले, अंगठी, पैंजण, कंबरपट्टा, बाजूबंद, साखळी असे विविध प्रकार आहेत. ट्रेडिशनल लूक असलेल्या या दागिन्यांत विविध रंगांचा वापर आहे.


या झुबकेदार दागिन्यांमध्ये वापरलेले मोठे मणी, पेंडल आणि त्यावर केलेले नक्षीकाम त्याचे वेगळेपण दाखवतात. डायमंडमध्येही रॉयल कलेक्शन आलेले आहे. दिवाळी, दसरा आणि लग्नसराई लक्षात घेऊन विविध
शोरूममध्ये ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत.


पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक दाजीकाका गाडगीळ यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त सोन्याचे आणि चांदीचे 5 ग्रॅम आणि दहा ग्रॅमचे कॉइन करण्यात आलेले असून यावर मजुरी न लावता ते ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.


हे लक्षात ठेवा
सोने किंवा चांदी यांची खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे इंडियन ब्युरो ऑफ स्टँडर्डकडून प्रत्येक दागिन्यावर होलोग्राम असण्याचे बंधनकारक केले आहे. ग्राहकांनीदेखील तो पाहूनच खरेदी करावी .


हटके टेम्पल दागिने
* 40 ते 50 ग्रॅम वजनाचे नेकलेस
* संपूर्ण मॅरेज सेट
* डायमंड ज्वेलरीमध्ये नवीन प्रकारात डायमंड सेट
* सध्या सोन्याचा दर : 30, 700 /-


खरेदीची योग्य वेळ
सध्या सोन्याचा भाव स्थिर आहे. सण-समारंभानिमित्त विविध ऑफर्सदेखील ठेवण्यात आल्या आहेत. नवीन पॅटर्न उपलब्ध आहे. आमच्याकडे अनंत सुवर्णवृद्धी ही आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे.
सचिन घाणेकर, शाखाप्रमुख, पु.ना. गाडगीळ