आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत दौ-यात मिशेल आेबामांचे रूप खुलले बिभूनिर्मित आकर्षक पाेशाखांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आेडिशाची पारंपरिक कलाकुसर, रंग, येथे तयार होणारा हातमागाचा कपडा या सर्वांचा बिभू यांच्यावर फार लहानपणापासून प्रभाव होता. या कोवळ्या वयातच डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. आईला शिवणकाम करताना पाहून वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी काही ड्रेसेसही तयार केले होते.
मात्र, फॅशन डिझायनिंग स्टुडिआे वा इन्स्टिट्यूट नसल्याने त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेणे शक्य झाले नाही. ते अभ्यासात हुशार होते. अर्थशास्त्रात बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांकडे एमबीए करण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही यासाठी परदेशात पाठवले.
अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेनेटी यांनी बिभूचे स्केच बुक पाहिले. त्यांनी डिझायनिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. अर्थशास्त्रानंतर डिझायनिंगसाठी प्रवेश अर्ज भरला. सर्वात प्रथम त्यांना फॅशन हाऊस हॉलस्टन येथे असिस्टंट डिझायनर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर फ्रेंच हाऊस जे. मेंडेलमध्ये ते दहा वर्षे डिझायनर डायरेक्टर म्हणून काम केले. संपूर्ण १०० टक्के माझेच काम असावे या प्रेरणेतून फेब्रुवारी २००९ मध्ये मेंडेल सोडले व फॅशन व्यवसाय थाटल्याचे बिभू यांनी सांगितले. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी मर्सिडीझ-बेंझ फॅशन शोमध्ये पहिल्यांदा रनवे शो करण्याची संधी मिळाली. सलमा हाइक, ग्लॅन क्लोज त्यांच्या डिझाइनचे पाेशाख वापरू लागले. आंतरराष्ट्रीय मासिक वोग, स्टाइल.कॉम, फोर्ब्ज, वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांना प्रसिद्धी दिली. सोनम कपूर, आलिया भट्ट, करिना,प्रियंका चोप्रा या अभिनेत्रीही त्यांनी डिझाइन केलेले पोशाख घालतात.
- बिभू यांनी ई-मेलद्वारे ‘दिव्य मराठी’ला माहिती दिली.

मिशेल यांनी घातला बिभूंच्या डिझाइनचा दुसरा पोशाख
२०१२ मध्ये लीनोच्या द टुनाइट शोमध्ये मिशेल यांनी बिभू यांच्या डिझाइनचा पोशाख घातला होता. त्यांनी यासंदर्भात सांगितले की, आज जे लीनो शो पाहा म्हणून मिशेल यांच्या कार्यालयातून एकेदिवशी दूरध्वनी आला. तोपर्यंत मी त्यांना भेटलो नव्हतो. शोसाठी दहा तास शिल्लक होते. हा वेळ लवकर जात नव्हता. मिशेल यांनी पोशाख घातलेला पाहून हरखून गेलो. हा १०० टक्के क्रेप प्रिंटेड ड्रेस त्यांच्या २०१२ रिझॉर्ट कलेक्शनमधील होता. गेल्या सात ऑक्टोबर रोजी व्हाइट हाऊसमध्ये डिझाइन इव्हेंट झाला. निमंत्रित डिझायनर्समध्ये त्यांचेही नाव होते. या कार्यक्रमात पहिल्यांदाच मिशेल ओबामांची भेट झाली. भारतात मिशेल यांनी घातलेला पोशाख हा बिभू यांच्या स्प्रिंग समर २०१५ कलेक्शनमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला पोशाख होता.

वर्षातून दोनदा घरी येतात
कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण संस्मरणीय आहे. त्यातल्या त्यात बहीण-भावातील कुरबुरी जास्त लक्षात राहतात, असे त्यांनी सांगितले. आई-वडिलांना न्यूयॉर्कला कधी नेता आले नाही, याची खंत वाटते. ते वर्षातून दोन वेळेस ओडिशाला येतात. त्यांनी डिझाइन केलेले कपडे मॉडेलच्या अंगावर पाहिल्यावर आईने आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जिथे कपडे घालायचे तिथे ते नाहीत आणि मागे शेपटावर किती कपडा वाया घातला आहे. वडिलांनाही आश्चर्य वाटायचे, काेणी कपडे डिझाइन करून कसे काय पैसे कमावत असेल? घरी आल्यानंतर मस्टर्ड सीड आणि योगर्ट पेस्टपासून बनवलेले बेक्ड हिलसा फिश खात असल्याचे बिभू यांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये दर आठवड्यात एक बॉलीवूड चित्रपट ते पाहतात. मॅनहॅटनमध्ये देवी, महाराजा स्वीट्स आणि मोहरीचा सार खाण्यासाठी जॅकसन हाइट्समध्ये जात असल्याचे बिभू म्हणाले.

हँडलूमला प्लॅटफॉर्म देण्यात पुढाकार
ते सिटा नावाच्या संस्थेशी जोडले आहे. ही संस्था ओडिशातील मागास भागात शाळा आणि रुग्णालय चालवते. मला शिक्षणाची आवड असल्यामुळे ओडिशातील लोकांना शिकवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक हातमाग वस्त्राला प्रकाशझोतात आणण्याच्या ते प्रयत्नात आहेत. - बिभू यांनी ई-मेलद्वारे ‘दिव्य मराठी’ला माहिती दिली आहे.