आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवणी अाॅगस्ट क्रांतिदिनाच्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्ट क्रांतीला यंदाच्या ९ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होताहेत. क्रांतीचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. त्यानिमित्त अनेक आठवणी मनात गर्दी करताहेत. त्यांना शब्दरूपात दिलेला हा उजाळा. 
 
आॅगस्ट १९४२ ला मुंबईला काँग्रेस वर्किंग कमिटीचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशात ब्रिटिशांना ‘भारत सोडून जा’ असा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव’ ठराव संमत झाला. दि. ला गाेवालिया टँक मैदानात (आजचे आझाद मैदान) गांधीजींचे भाषण झाले. ते ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. गांधींचा आवाज शांत होता. शब्दाशब्दातून निर्धार व्यक्त होत होता. ते म्हणाले, आतापासून भारतातील प्रत्येक नागरिकाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजून वागावे. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय माझे कशानेही समाधान होणार नाही. आपण एकतर स्वातंत्र्य मिळवू किंवा स्वातंत्र्यासाठीच्या प्रयत्नात मरून तरी जाऊ. ‘करेंगे या मरेंगे’ हा प्रेरक मंत्र गांधीजींनी भारतीयांना दिला. या मंत्राने सारे अभिमंत्रित झाले. भारतीयांची मने स्वातंत्र्याकांक्षेने पेटून उठली. सारे मरणाला सिद्ध झाले. ‘अंग्रेजो भारत छोडाे’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणा लाखोंच्या कंठातून निनादून गगनाला भिडल्या. 
 
ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर गांधीजी, महादेवभाई देसाई, मीराबेन आणि इतर शीर्षस्थ पुढाऱ्यांना अटक करून अज्ञातस्थळी नेण्यात आले. गांधीजींच्या अटकेने पेटलेली मने भडकूनच उठली. ‘करेंगे या मरेंगे’ या मंत्राचा प्रभाव शतपटीने वाढला. घरादारांवर तुळशीपत्र ठेवून सारे मरणाला सिद्ध झाले. लोक रस्त्यावर गोळा झाले, निषेधाचे मोर्चे निघाले. सारे वातावरणच भारलेले होते. भारतीय मरणाला सिद्ध होते. तर ब्रिटिश सरकार अत्याचारांची पराकाष्ठा करायला सिद्ध होते. 
 
ऑगस्टला सकाळीच गांधीजींच्या अटकेची बातमी आमच्या वर्ध्याच्या महिलाश्रमात येऊन धडकली. त्या काळात संपर्कासाठी पत्रे तारा एवढीच साधने उपलब्ध होती. आश्रमात ना फोन होता ना रेडिअो. तरी बातमी रातोरात जणू वाऱ्यावर स्वार होऊन आश्रमात पोहाेचली होती. आश्रमातील जबाबदार लोकांनी लगेच एकत्र येऊन पुढील रणनीती ठरवली. आश्रमावर जप्ती येणार, अटकसत्र सुरू होणार हे अंदाज होतेच. आश्रम बंद करण्याचा निर्णय झाला. महिलाश्रमात शिकण्यासाठी साऱ्या भारतातून मुली येत. त्या छात्रालयात रहात. ‘मुलींना घेऊन जा’ अशा तारा मुलींच्या पालकांना करण्यात आल्या. काही अपवाद वगळता आमच्या मुली तिथेच राहून तुमच्या मार्गदर्शनाखाली चळवळीत भाग घेतील असे निरोप सर्व पालकांकडून मिळाले. छात्रालय बंद होणार, मुलींच्या राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. काही मुलींची कार्यकर्त्यांच्या घरी आणि बऱ्याच मुलींची जमनालालजींच्या बंगल्यावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. जेलमध्ये जाण्यासाठी मुलीही सिद्ध झाल्या. १० तारखेला रात्री जमनालालजींच्या घरी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. ४२च्या निर्णायक लढ्यात ‘करेंगे या मरेंगे’ या मंत्राप्रमाणे मरणाच्या तयारीनेच सर्व बैठकीला आले होते. सर्वांनी आपली मृत्युपत्रे तयार केली. आपल्यानंतर मुलाबाळांना कुठे पोहाेचवायचे याचीही मृत्युपत्रात नोंद होती. रात्री १२ च्या आसपास आई-काका (माझे आई-वडील) बैठक संपवून घरी आले. पाऊस कोसळत होता. वीज नव्हतीच, अंधार मी म्हणत होता. तसेच पावसात भिजत रस्ता चाचपडत ते घरी आले. साऱ्या आश्रमाचे वातावरण गंभीर होते. दिवस फार धामधुमीचे होते. 
 
घरावर जप्ती येणार हे गृहितच हाेते... 
आई-काकांनाबाहेरच्या कामाबरोबर घरचीही बरीच कामे उरकायची होती. घरात जी काही भांडी होती ती, घरातल्या गोधड्या- घोंगड्या, पुस्तके यांची बांधाबांध करून परिचितांकडे नेऊन ठेवायचे होते. कारण घरावर जप्ती येणार हे गृहितच होते. आम्हा तिन्ही मुलांना भाऊ, ताई आणि धाकटी मी आजोळी पोहाेचवायचे होते. त्यासाठी पैशाची जमवाजमव करायची होती. दोघांचा दिवस बाहेरच्या कामातच जायचा. घरची कामे रात्री करावी लागायची. 
बातम्या आणखी आहेत...