आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Clean On Mhausur Kitta News In Marathi

भास्कर ग्राउंड रिपोर्ट: म्हैसूरचा कित्ता, तरच औरंगाबादही स्वच्छ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थेट म्हैसूरहून : शहर स्वच्छतेची वैशिष्ट्ये
प्राचीन महालांच्या झरोक्यांतून डोकावणारा सांस्कृतिक वारसा, नगररचनेची ऐतिहासिक मांडणी आणि पर्यटनाच्या नकाशावरील वेगळी ओळख. औरंगाबाद आणि म्हैसूर तसे सारखेच. पण वर्तमानात तफावत. अदमासे अौरंगाबादएवढ्याच म्हणजे १२ लाख लोकसंख्येचे म्हैसूर स्वच्छतेत नंबर वन आहे, तर स्मार्ट सिटी होण्याची स्वप्ने पाहणारे औरंगाबाद १९० व्या स्थानी आहे. आमचे वार्ताहर आनंद चौधरी यांनी म्हैसूरला जाऊन केलेले वार्तांकन...

म्हैसूर नंबर वन, ५२२ लोकांमागे एक कर्मचारी
1. कल्चर व मानसिकता : स्वच्छता म्हैसूरचे कल्चर, सक्ती नाही

स्वच्छता सवयीचा भाग
१८६२ मध्ये पालिका. १०५ वर्षांपूर्वी १९१० मध्ये भूमिगत गटारे. १९०८ मध्ये शहरात पथदिवे. २०१० मध्ये म्हैसूर दुसरे. पाच वर्षांत चंदिगडला मागे टाकून पहिले स्थान मिळवले.
कोणतेही शुल्क नाही
म्हैसूर पालिकेचे बजेट ८०० कोटी. जनतेला स्वच्छता शुल्क लागत नाही. पालिका तत्पर आहे, तेवढेच येथील लोकही स्वच्छतेचे भोक्ते आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट
२.५ लाख घरांत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी हिरवे, लाल डस्टबिन दिले. ओल्या कचऱ्यातून खत किंवा बायोगॅस निर्मिती केली जाते.

2.कार्य आणि देखरेख : घरोघरी जाऊन १०० टक्के कचरा जमा
अधिकारी रोज फील्डवर

म्हैसूरमध्ये रोज घरोघर १०० टक्के कचरा गोळा होतो. २२९३ सफाई कामगारांसोबत अ व ब दर्जाच्या ६० अधिकाऱ्यांची टीम सकाळी ६ ते १.३०पर्यंत फील्डवर असते.
100% रस्ते स्वच्छता
अ श्रेणीतील ४५ रस्ते व १२ सर्कल्सची रोज स्वच्छता. ब श्रेणीतील ७० रस्ते एक दिवसाआड स्वच्छ.
क श्रेणीतील १५० रस्ते आठवड्यातून एकदा स्वच्छ केले जातात.

5 अधिकारी पथकात
१. सहआयुक्त
२. विकास अधिकारी
३. आरोग्य निरीक्षक ४. पर्यावरण अभियंता ५. महसूल निरीक्षक

3. पायाभूत सुविधा : तक्रारींचाही तत्काळ निपटारा
साधनांवर नियंत्रण
जीपीएसयुक्त २० डंपर, २६ टिप्पर, २ काँपेक्ट्रस वााहनांसह ३६६ गाड्या ४०२ टन कचरा जमवतात. रात्री स्वीपिंग मशीनने रस्त्यांची स्वच्छता होते.

ड्रेनेजची पूर्ण देखभाल
ड्रेनेजसाठी 3 जेटलिंग मशीन, ४ डी सिल्टिंग, सेसपुल क्लीनर मशीन, २३ रोडिंग मशीन, २३ टाटा अॅस वाहन व २५९ कर्मचारी. यूजीडीच्या प्रश्नी २३ पथके २४ तास सज्ज.

रॅपिड अॅक्शन फोर्स
स्वच्छता तक्रारींवर अभय हा रॅपिड अॅक्शन फोर्स. ड्रेनेज तुंबल्यास १० एचपीचे सक्शन पंप, इलेक्ट्रिक कटर, हॅमर, टूल किटसह फोर्स हजर.

औरंगाबाद: ७५० लोकांमागे एक कर्मचारी, नियम ५०० लोकसंख्येचा
मनपाचे बजेट : ७२० कोटी रुपये असून दरवर्षी वसुली ५०० कोटी रुपये होते.
कचरा : शहरातून दररोज ५०० टन पर्यंत उचलला जातो. ८० ते १०० टनांपर्यंत कचरा उचलण्यात मनपा अपयशी असते.
घरोघर: ५० टक्के कचरा घरोघरी उचलण्यात येतो. किमान २०० ते २५० टन रस्त्यावरून, तर तेवढाच कचरा डोअर टू डोअर घेण्यात येतो.
लोकसंख्या: शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११ लाख ४० हजार आहे.
सफाई कर्मचारी : सफाईच्या कामी १८४० कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी सहा वॉर्ड अधिकारी आहेत.
कचरा उचलण्याची पद्धत : घंटागाडी, स्कील लोडर, फावडे व टोपल्याने उचलला जातो. रस्त्यावरचा कचरा मजूरच गाडीत टाकतात. हुक लोडरचा क्वचित वापर होतो. यंत्रांची संख्या तुटपुंजी आहे. कचरा वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरने केली जाते.
कचरा प्रक्रिया: शहरात असा कोणत्याही प्रकारचा प्रकल्प नाही.
तक्रार निवारण: तक्रारींसाठी ऑनलाइन पद्धत. नगरसेवकांकडे लोक तक्रार करतात. वर्षभरात पाच ऑनलाइन तक्रारीपैकी तीन तक्रारी सोडवल्याचा मनपाचा दावा.
ड्रेनेज: १५२ गुंठेवारीच्या वसाहती आहेत. यातील ५२ वसाहतींत ड्रेनेज नाही. नवी याेजना प्रस्तावित. शहरात ५२ अधिकृत स्लम वसाहती आहेत.