Home | Divya Marathi Special | auto rickshaw driver well in house

गरजेपोटी रिक्षाचालकाने घरीच खोदली विहीर

संजीत कुमार मिश्र (कतरास) | Update - Jun 04, 2011, 01:14 PM IST

पंजाबमधील कतरास येथील विनोद या रिक्षाचालकाने घरातला पाण्याचा त्रास दूर करण्यासाठी चक्क अंगणातच एक विहीर खोदली.

  • auto rickshaw driver well in house

    गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. पंजाबमधील कतरास येथील विनोद या रिक्षाचालकाने घरातला पाण्याचा त्रास दूर करण्यासाठी चक्क अंगणातच एक विहीर खोदली. विशेष म्हणजे कोणतीही मदत न घेता विनोद आणि त्यांच्या परिवारातील लोकांनी ही १५ फूट खोल विहीर खोदली आहे.

    गुजराती मोहल्ल्यात राहणारे विनोद यांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेतली. पाण्यासाठी वणवण भटकणारी माणसे पाहिल्यानंतर त्यांना यावर काहीतरी उपाय शोधावा वाटला. आणि या गरजेतूनच त्यांनी घराच्या अंगणात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही सक्रिय हातभार लावला. अवघ्या वीस ते बावीस दिवसात त्यांनी जवळपास पंधरा फूट खोल विहीर खणली. त्याला पाणी लागले आणि त्यातून निघणा:या २ गॅलन पाण्यामुळे विनोद यांच्या कुटुंबाची पाण्याची गरज पूर्णपणे भागते आहे. कोणत्याही बाह्य मदतीशिवाय विनोद यांनी केलेले हे काम इतरांना आदर्शवत असेच आहे.

Trending