आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनसवर उपचारासाठी प्रतिजैविकांचा वापर टाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे लगेच संसर्ग होण्याचा धोका असतो. यात सायनस होण्याचे प्रमाण अधिक आहे. थोडेसे भिजलात तरी तुम्ही बळी पडलात म्हणून समजा. फिजिशियन्सला सांगितलेले असते की, सायनसायटिस झाल्यास प्रतिजैविकांचा सल्लो देऊ नका. सामान्यपणे डॉक्टर सायनसायटिस झालेल्या रुग्णाला तत्काळ अँटिबायोटिक देतात. त्यामुळे इतर दुष्परिणाम होऊ लागतात आणि समस्या जैसे थे राहते.


नाक वाहणे, नाक चोंदणे, चेह-यावर सूज येणे, वेदना होणे, डोकेदुखी, कफ आणि ताप ही सायनसची लक्षणे आहे. थंडीतील 90 ते 98 टक्के विषाणुंमुळे सायनसचा संसर्ग होतो. यात प्रतिजैविकांची गरज नसते. लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील तीन ते सहा दिवसांत तो आपोआप बरा होतो. अनेकदा हा आजार बरा होण्यासाठी 10 दिवसही लागू शकतात. अगदी विषाणूजन्य ताप असेल तरीही तो 48 ते 72 तासांच्या आत कमी होऊ लागतो. अनेकदा लहान मुलांना अशा प्रकारचा ताप 10 ते 14 दिवस राहतो. अशा प्रकारे सायनसची लक्षणे अनेक दिवस टिकून राहिली, तर तो नष्ट करण्यासाठी अँटिबायोटिक घ्यावे लागतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विषाणूजन्य आजार आणि सायनसचा संसर्ग यातील फरक ओळखणे कठीण असते. सायनस होऊन दहा दिवस उलटल्यानंतर अँटिबायोटिक घ्यायला हवे. सॅट्रिजिन, लोराटेडिनसारखे अँटिहिस्टामाइन्स घेणे टाळावे. जास्तीत जास्त पातळ पदार्थ सेवन करावेत. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटेमॉल घेऊ शकता.