आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray's First And Last Speech From Dasara Melawa

वाचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा, पहिला आणि अखेरचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र संग्रहित - Divya Marathi
छायाचित्र संग्रहित
19 जून 1966 रोजी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना झाली आणि या पक्षाचा पहिला दसरा मेळावा 30 आॅक्टोबर 1966 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ऐतिहासिक शिवाजी पार्कवर झाला. याच मैदानावर गेली 46 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो मराठी भाषिकांना मार्गदर्शन करीत आगामी वाटचालीची दिशा दिली होती.
ज्याला उत्तम मराठी येतं त्यालाच महाराष्ट्रात नोकरी मिळेल
(पहिला मेळावा- 30 ऑक्टोबर 1966)
समोरच्या गर्दीला उद्देशून बाळासाहेब ठाकरे म्हणाले : ‘असं हे दृश्य आहे की जो कोणी येथे आला नसेल तो दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मला वाटतं महाराज जर येथे असते तर त्यांचं घोडंसुद्धा उधळलं असतं ! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसर्‍याच्या दिवशीच होणार होता; पण तो लांबला. कारण महाराजांना असं वाटलं असेल की काय उपयोग आहे येऊन या शिवाजी पार्कवर? जेथे माझा मराठी माणूस भेकड, नेभळट, नामर्द झालेला आहे, तिथे पार्कमध्ये भय्ये हिंडताहेत. चुरमुरेवाले, खाणारेदेखील उपरेच. म्हणून महाराजांनी ठरवलं असेल की प्रथम हा ‘शिवसेने’चा मेळावा पाहतो, मराठी माणूस जिवंत आहे की नाही ते बघतो आणि तो जिवंत असेल तर मग 13 ला नाही, 6 तारखेला येतो!
जे आमच्यावर आरोप करताहेत त्यांना मला सांगायचं आहे की जर मराठी माणूस हा जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित मनोवृत्तीचा असता तर सदोबाची ही मुंबई कॉस्मोपोलिटीन झालीच नसती. कारण आम्ही विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलं की आपण सगळे भारतीय आहोत. ते मद्रासचे मुख्यमंत्री म्हणतात की, ज्याला उत्तम तामीळ येतं त्यालाच त्या राज्यात नोकरी मिळेल. आम्हालाही आमच्या राज्यकर्त्यांना हेच सांगायचंय... ज्याला उत्तम मराठी येतंय त्यालाच या महाराष्ट्रात नोकरी मिळेल, हाऊसिंग गाळा मिळेल. होय, मी प्रांतीय आहे, जातीय आहे, संकुचित वृत्तीचा आहे.
‘हिंदी’त आलेल्या फतव्याला केराची टोपली दाखवा हे म्हणणार्‍या कामराजांनी महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवू नये! महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग असा आरोप करतात की, ‘शिवसेना’ हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचं कुंपण घालीत आहात; पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रद्धेचं आहे.’
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'मी आता थकलोय... उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या', असे म्हणाले होते बाळासाहेब...