आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

बॉलीवूडवर ‘बाळासाहेब प्रभाव’कित्‍येक दिग्‍गजांशी होती मैत्री, कुणाशी शत्रुत्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाचे कुणाला आकर्षण होते? बाळासाहेबांना चित्रपटसृष्टीचे की चित्रपटसृष्टीला बाळासाहेबांचे? एक मात्र नक्की, राजकारणाप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही बाळासाहेब ठाकरे या नावाचा मोठा प्रभाव होता. दिलीपकुमार-मनोजकुमार-सुनील दत्त-अमिताभ बच्चनसारख्या दिग्गजांशी त्यांची यारीदोस्ती होती आणि संजय दत्तपासून गोविंदापर्यंतच्या नटांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.

अमिताभच्या पाठीशी...
1984 मध्ये बंगळुरू येथे ‘कुली’च्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चनला अपघात झाला होता. मरणाशी झुंज देणा-या अमिताभला तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. ज्या दिवशी अमिताभला मुंबईला आणले गेले तो दिवस नेमका ‘मुंबई बंद’चा होता. वातावरण अतिशय तणावाचे होते. कधीही कुठल्याही क्षणी उद्रेक होईल अशी परिस्थिती होती. अमिताभला रुग्णालयात वेळेत पोहोचवणे अत्यंत गरजेचे होते. पण यातून मार्ग कसा काढायचा, असा भला मोठा प्रश्न बच्चन कुटुंबीयांपुढे त्या वेळी होता. अशा वेळी स्वत: बाळासाहेब ठाकरे बच्चन कुटुंबाच्या मदतीला धावून आले. त्यांनी शिवसेनेतर्फे अमिताभला रुग्णालयात आणण्यासाठी त्या दिवशी अ‍ॅम्ब्युलन्सची तातडीने व्यवस्था केलीच, पण विश्वासातल्या शिवसैनिकांना सांगून पुढे किती तरी दिवस खास अमिताभसाठी लंडनहून मागवलेली औषधे विमानतळावरून सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचतील याची काळजीही घेतली.

आजारपणाच्या काळात ज्याच्यासाठी बाळासाहेबांनी मदतीचा हात पुढे केला, त्याच बाळासाहेबांनी अमिताभ बच्चनच्या खासदारपद सोडल्यानंतर प्रदर्शित झालेल्या टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशहा’वर बंदी घालण्याचा हिसकाही दाखवला. त्या वेळी बोफोर्स तोफ भ्रष्टाचार प्रकरणात अमिताभ आणि भाऊ अजिताभचेही नाव गोवले गेले होते. ‘भ्रष्टाचारी अमिताभ’चा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी राजकीय भूमिका घेऊन बाळासाहेबांनी अमिताभला ‘मातोश्री’वर येणे भाग पाडले होते. परंतु हा एक विरोधाचा प्रसंग वगळता अमिताभ आणि त्यांचे संबंध अखेरपर्यंत सौहार्दपूर्ण राहिले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणाचे होते तारणहार..