आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलुचिस्तानमुळे पाकिस्तानच्या आणखी दुखऱ्या नसांत कळ...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच झटक्यात पाकिस्तानला एकाच झटक्यात बचावाच्या अवस्थेत आणले आहे. एवढेच नाही तर त्यांनी बलुचिस्तानच्या रूपाने काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा अस्तित्वात असून त्याच्यावर तोडगा निघणे बाकी आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जोरदारपणे मांडली आहे. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्व काही ठीक नाही, तेथे काश्मीर खोऱ्यापेक्षा जास्त दमन होत आहे हेही समोर आणले आहे. युद्ध मैदानातच लढली जातात असे नाही तर काही चाली खेळून त्यापेक्षा चांगला परिणाम होतो. पाकिस्तानबाबतच्या परराष्ट्र धोरणात व्यूहरचनेतील बदल हा त्याचा पुरावा आहे.

भारतही पाकिस्तानच्या एकता-अखंडत्वाला लक्ष्य बनवू शकतो, हा त्याचा अर्थ आहे. १३ लाख लोकसंख्या आणि पाकिस्तानच्या ४४ टक्क भागात पसरलेला बलुचिस्तान पाकची दुखरी नस आहे. पण भारताने तिच्यावर हात ठेवला नाही. सिंधू संस्कृतीचा पश्चिमकेडील भाग आणि द्रविडी आनुवांशिक गुण असलेल्या कुर्दवंशीयांच्या या भागाची ऐतिहासिकदृष्ट्या भारताशी जवळीक आहे. या नात्याने भारताने बलुचिस्तानची वस्तुस्थिती जगासमोर आणणे आवश्यक होते. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. बहुदा हीच योग्य वेळ असावी, कारण जागतिक दहशतवादाच्या स्रोताच्या रूपात पाकिस्तानची ओळख प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याच लोकांवर पाकिस्तान दडपशाही करत आहे हे समोर आले आहे.

सध्याच्या बलूच आंदोलनाची मुळे १६६६ मध्ये बलुचिस्तानच्या कलात भागात मीर अहमदच्या ‘खानत’मध्ये (संस्थान) आहे. फाळणीच्या वेळी तेथे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली कलात संस्थान होते. त्याने पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला होता. मार्च १९४८ मध्ये पाकने लष्कर पाठवून विलीनीकरणाच्या करारावर तत्कालीन शासक यार खानची सही घेतली होती, पण त्याच्या भावांनी संघर्ष सुरूच ठेवला.

पाकिस्तानसाठी बलुचिस्तानचे महत्त्व मोठे आहे,कारण तेथे गॅस, युरेनियम, तांबे, सोने आणि इतर धातूंचा मोठा साठा आहे. त्याच्या वायू साठ्यांतून अर्ध्या पाकिस्तानची गरज भागते. मध्य आशियात प्रवेशासाठी चीन ज्या ग्वादर बंदराची निर्मिती करत आहे ते येथेच आहे. इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनही येथूनच जाते. शांतता असली तरच हे प्रकल्प शक्य आहेत. त्यासाठी पाकला बलूच लोकांशी करार करावा लागेल किंवा लष्करी दमन करावे लागेल.

पाकिस्तानने दुसरा मार्ग निवडला. आपल्याच लोकांवर एफ-१६ विमानांनी बॉम्ब टाकणारा पाकिस्तान हा एकमेव देश असावा. बलुचांचे नेते अकबर बुगती यांना तर गुहेत क्षेपणास्त्र डागून मारले. जगापासून बलुचिस्तानला वेगळे पाडले आहे. माध्यमांना तेथे प्रवेश नाही. बृहद स्वतंत्र बलुचिस्तान हे बलुचींचे उद्दिष्ट आहे कारण त्याचा भाग इराण आणि अफगाणिस्तानातही आहे. मध्य आशियात प्रवेश आणि तेथून हिंद महासागरात जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असल्याने अफगाणिस्तानसह पूर्ण भाग महत्त्वाचा आहे.

१८९३ मध्ये ब्रिटिश सरकारने तेव्हा भारत आणि अफगाणिस्तानला वेगळे करण्यासाठी ड्युरँड सीमा रेषा आखली. ही रेषाच पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील वादाचे कारण आहे. हीच पाकची दुखरी नस आहे. पाकिस्तानला बांगलादेशसारखी चिंता नसेल कारण बलूच लोकांत पूर्ण दक्षिण-पश्चिम भागावर कब्जा करण्याची क्षमता नाही. बाहेरील मदतीनेही ते शक्य नाही कारण अफगाणिस्तान अंतर्गत संघर्षात अडकलेला आहे. भौगोलिक स्थितीमुळे भारताला ते शक्य नाही.

पाकिस्तानी जनतेतही बांगलादेशसारखी स्थिती होईल ही भीती आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये मानवाधिकाराच्या नावाने ओरड करतो, बलुचिस्तानमधील त्याचे रेकॉर्ड तर खूपच लाजिरवाणे आहे. दररोज सकाळी कोंबड्याच्या बांगेप्रमाणे पकािस्तानी नेते काश्मीर-काश्मीर असा धोशा लावतात, आता त्यांना बलुचिस्तानमधील दडपशाहीबाबत जगासमोर स्पष्टीकरण देताना चांगलाच घाम फुटेल.

मोदींनी पाकव्याप्त काश्मीरचा फक्त उल्लेख केला. उत्तर भाग, जिये सिंध याही पाकच्या दुखऱ्या नसा आहेत. खरे म्हणजे पाकिस्तानचा विचार हा पंजाबी प्रभुत्व असणाऱ्यांचा विचार होता. इतर जातीय गट नेहमीच अस्वस्थ असतात. ही वस्तुस्थिती आज जेवढी जाणवत आहे, तेवढी कधीच जाणवली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...