आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगावात शेतकरी घेताहेत केळीचे विक्रमी उत्पादन; केळीच्या उत्पादनातून लाखों रुपयांची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- तालुक्यातदुष्काळी परिस्थितीतही पाण्याचे नियाेजन करून किन्ही, गोंदेगाव, वरठाण, वाडी-बनोटी या भागातील शेतकरी केळीचे विक्रमी उत्पन्न घेताहेत. त्यातच चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बडोदा, सुरत, इलाहाबाद आदी ठिकाणाहून केळीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घेण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे पाहावयास मिळत आहे.

सोयगाव तालुका केळीच्या उत्पादनात अग्रेसर अाहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी दरवर्षी विहिरीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून अत्यल्प पाण्यात येणारी पिके घेतात. त्यामुळे आजघडीला या भागात केळीचे उत्पादन सर्वांधिक असल्याचे पाहावयास मिळत आहे. या भागातील शेतकरी पूर्वी कांदेबाग केळीच्या वाणाची लागवड करत असे. परंतु आता मागील काही वर्षापासून सर्वांधिक उत्पन्न देणाऱ्या नवत्या वानाची लागवड करताना पाहावयास मिळत आहे. विशेष बहुतांश शेतकरी एकत्र राहतात. त्यामुळे शेताची विभागणी झाल्यामुळे त्यांना विहिरीत उपलब्ध पाणी दिवसानिहाय वाटून घेतात शेतात लागवड केलेल्या केळीच्या बागांना पाणी देतात.

दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा केळीचे उत्पादन घेण्याकडे वळवला आहे. त्यामुळे गोंदेगाव परिसरात १० हेक्टर, वरठाण २५ हेक्टर, बनोटी १५ हेक्टर अन्य भागात ५० हेक्टरवर केळीचे उत्पादन घेताहेत. या भागात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.
टिश्यू बेण्याची लागवड
सोयगावतालुक्यात केळीच्या बेण्याची लागवड करण्यासाठी प्रथम शेताची नांगरणी केली जाते. त्यानंतर वाफे तयार करण्यात येतात. तसेच दोन ते तीन ट्रॅक्टर कुजलेले शेणखतही टाकले जाते. एका एकरात जवळपास दोन ते अडीच हजार केळींच्या बेण्यांची लागवड होते. पूर्वी केळी लागवडीसाठी गावरान बेणे लावण्याची पद्धती होती. हे बेणे लावल्याने शेतकऱ्यांना वर्षभर केळीची कटाई करावी लागत असे. मात्र, गावरान बेण्याची जागा आता टिश्यू रोपांनी घेतली आहे. त्यामुळे वारंवार केळीची छोटी छोटी वाढलेली रोपे कापण्याचा शेतकऱ्यांचा ताण वाचल्याचे पहावयास मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...