आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय उपकरणांतील उणिवा शोधणारा जादूगार काळाच्या पडद्याआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील हॅकर आणि आयटी तज्ज्ञ गुरुवारी लास वेगासमध्ये जमले होते. या हॅकिंग कॉन्फरन्समध्ये दुपारी दोन ते तीनची वेळ रिकामी ठेवण्यात आली होती. या तासात सगळे बार्नबे जॅकची आठवण काढत होते. तो जर जिवंत असता तर त्याच वेळी त्याचे प्रेझेंटेशन सुरू असते. त्यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित बनले असते. पण आठवडाभरापूर्वीच (25 जुलै) 35 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या प्रेझेंटेशनकडे जगाचे डोळे लागलेले होते. त्याचे
कारण पुढीलप्रमाणे - मूळ : न्यूझीलंडच्या राहणाºया बार्नबे जॅकला जग हॅकर म्हणून ओळखते. 2010 मध्ये त्याने 15 फुटांच्या अंतरावरून एटीएममधून पैसे काढून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर बँकांनी लोकांच्या पैशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी जॅककडून माहिती घेऊन एटीएममध्ये तांत्रिक सुधारणा केल्या होत्या. जॅकचे त्यानंतरचे प्रेझेंटेशन मानवी जीव अधिक सुरक्षित बनवण्याचे होते. पण ते पाहण्यापासून जग वंचित राहिले. जॅकने फेब्रुवारी महिन्यातच त्याच्या ब्लॉगवर या प्रयोगासंबंधी महत्त्वाची माहिती प्रकाशित केली होती.

काही महिन्यांपूर्वी जॅकने टीव्हीवर एक मालिका पाहिली. होमलँड नावाच्या या मालिकेत एक दहशतवादी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या हृदयात लावलेले पेसमेकर हॅक करतो. त्यानंतर त्यातून विजेचा एवढा मोठा धक्का देतो की, उपराष्ट्रपतींचा जागेवरच मृत्यू होतो. हे पाहताच जॅकची उत्सुकता वाढली. खरंच असे होऊ शकते का? याची माहिती घेणे त्याने सुरू केले.

याची माहिती घेणे गरजेचे होते. कारण अमेरिकेच्या एफडीए या औषध नियामक संस्थेने 2006 मध्ये पेसमेकर, आयसीडी आणि इन्सुलिन पम्म अशा वायरलेस इम्प्लांट उपकरणांना मंजुरी दिली होती. त्यानंतर जगात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. फक्त अमेरिकेतच अशा प्रकारची 30 लाख उपकरणे लावण्यात आली आहेत. हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होत असेल तर पेसमेकर आणि आयसीडीच्या मदतीने विजेचा नियंत्रित झटका देऊन ही गती नियंत्रित केली जाते. पण जॅकने या उपकरणाच्या तंत्रज्ञानातील कमतरता शोधून काढली. हे उपकरण हॅक करून 830 डिग्रीपर्यंतचा झटका देता येतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, असे त्याने सांगितले. अशीच कमतरता त्याने इन्सुलिनमध्येही शोधली. त्याला हॅक करून 300 फुटांवरून रुग्णाला
इन्सुलिनचा जीव घेणारा डोस दिला जाऊ शकतो. त्याच्या या रिपोर्टवर ही उपकरणे बनवणाºया मेडट्रॉनिक्स कंपनीने आवश्यक त्या सुधारणाही केल्या. पण प्रश्न अजूनही कायम होता. ही उपकरणे खरच हॅक करता येतात का?

2012 मध्ये जॅकने मेलबर्न येथील कॉन्फरन्समध्ये ही उपकरणे हॅक करून दाखवली होती. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्याने याचा व्हिडिओ तयार करू दिला नव्हता. लास वेगासमध्ये होणाºया परिषदेत पुन्हा असे प्रात्यक्षिक दाखवून जॅक लोकांना सावधानतेचा इशारा देऊ इच्छित होता. पण तसे झाले नाही. सॅनफ्रान्सिस्कोच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी जॅकचा मृत्यू नैसर्गिक नसल्याची शंका उपस्थित केली आहे. त्याचा तपास सुरू आहे.