आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर SAFE राहण्यासाठी करा या गोष्टींचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सगळेच सोशल मीडियाचा वापर करत असतो. पण 'फेसबुक' या लोकप्रिय साईटवर एका तरुणीच्या फोटोचा दुरूपयोग झाल्याची घटना नुकतीच घडली. याचा तिला प्रचंड धक्का बसला होता. परिणामी तिने आत्महत्येचा निर्णय घेऊन जीवनप्रवास संपवला.

आज आपल्या सभोवताली अशा अनेक घटना घडतात. त्याला 'सोशल नेटवर्किग़ साईट' हे एकमेव कारण सांगितले जाते. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसाकाठी किमान एक तरी घटना समाजासमोर येत असते. यासाठीच सोशल मीडियावर, खासकरून 'फेसबुक'चा वापर करताना कोणती प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
असे ओळखा फेक अकाउंट...
फेक अकाउंट्सचा वापर हा एखाद्याचे अकाउंट हॅक करणे, एखाद्या विशिष्ट वस्तुची जाहिरात अथवा स्पॅम-व्हायरस पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा प्रकारच्या फेक अकाउंट्सचे बळी तुम्ही होऊ नयेत, यासाठी हे काही उपाय फायद्याचे ठरू शकतात.

- फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवणा-या व्यक्तीला तुम्ही ओळखत नसाल तर त्याला जाब विचारा, की तो तुमच्याची मैत्री का करू इच्छीतो. त्याला तुमचे प्रोफाइल कोठून मिळाले?
- त्याच्या प्रोफाइलवर जाऊन म्युचुअल (कॉमन) फ्रेंड्स अथवा फॉलोव्हर्सवर (ट्विटरवर) नजर टाका. जर कोणी कॉमन फ्रेंन्ड असतील तर त्या व्यक्तीकडून त्या रिक्वेस्ट पाठवणा-या व्यक्तीची सखोल माहिती घ्या.
- प्रोफाइल व्यवस्थीत वाचून ओळख़ीबाबत शाहनिशा करावी.
- प्रोफाइलवर लावण्यात आलेला फोटो सेव्ह करून गुगलवर इमेज सर्च करावी. यामुळे लावण्यात आलेला फोटो हा त्याच व्यक्तीचा आहे अथवा कुणा दुस-याचा, हे समजण्यास मदत होईल.
- रिक्वेस्ट पाठवणा-या व्यक्तीची फ्रेंन्ड लिस्ट चेक करावी. जर त्याची फ्रेंन्डलिस्टची संख्या बरीच असेल आणि त्या व्यक्तीशी अनुरूप असे मित्र त्यामध्ये नसल्यास रिक्वेस्ट फेटाळणेच योग्य ठरेल.
- त्या व्यक्तीची फेसबुक वॉल चेक करून तो कुठल्या प्रकारच्या पोस्ट टाकतो. अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्यास त्या व्यक्तीस ब्लॉक करा. ब-याच दिवसांपासून त्या व्यक्तीची कुठलीच पोस्ट नसेल तर ते अकाउंट फेक असण्याची दाट शक्यता असू शकते.
- ब-याच व्यक्ती एकाच वेळी बरेच फेक अकाउंट देखील चालवत असतात. सखोल अभ्यास केल्यास असे वाटेल की, हा एखाद्या मित्राने तयार केलेला ग्रुप आहे. पण असे प्रकार करणारी व्यक्ती ही एकच असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ग्रुपपासुन निश्चितच सावध राहा.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फेसबुक वापरताना कसे सुरक्षित राहावे...